उन्हाळ्यात शरीरावरील टँनिग दूर करण्यासाठी ‘हे’ 5 नैसर्गिक मास्क वापरा
उन्हाळा सुरू झाला असून सर्वत्र कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे या हंगामात प्रत्येकजण आरोग्याबरोबर शरीराची देखील काळजी घेत असतात. अशातच तीव्र सुर्यप्रकाश आणि वातावरणातील गरम हवा यामुळे त्वचेवर टॅंनिग होणे ही एक सामान्य समस्या आहे. उन्हात जास्त वेळ घालवल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. विशेषत: जेव्हा तुम्ही सनस्क्रीनशिवाय बाहेर जाता तेव्हा ही समस्या आणखी वाढते. टँनिग फक्त चेहऱ्यापुरते मर्यादित राहत नाही तर हात, मान, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करू शकते.
बाजारात असे अनेक कॅमिकलयुक्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत जे टॅनिंग काढून टाकण्याचा दावा करतात, परंतु ते तुमच्या त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर असतीलच हे सांगता येत नाही, म्हणून नैसर्गिक पद्धतींनी टॅनिंग काढून टाकणे हा सर्वोत्तम आणि सुरक्षित उपाय आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही घरगुती टॅन रिमूव्हल मास्कबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीरावर वापरू शकता. हे तुमच्या त्वचेवरील टॅन काढून टाकतीलच पण तुमची त्वचा चमकदार देखील करतील.
दही आणि बेसन मास्क
त्वचेवरील टॅन काढण्यासाठी दही आणि बेसनाचा मास्क सर्वात प्रभावी मानला जातो. ते त्वचेला डी-टॅन करते. त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा चमकदार आणि मऊ करते. दही आणि बेसनाचा मास्क तयार करण्यासाठी, १ टेबलस्पून बेसन २ टेबलस्पून दह्यात मिसळा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद आणि काही थेंब लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि15-20 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
टोमॅटो आणि लिंबू मास्क
टोमॅटो आणि लिंबू मास्क शरीरातील टॅन काढून टाकण्यास आणि त्वचेला उजळवण्यास देखील मदत करतो. तसेच तुमच्या त्वचेवरील डाग कमी करण्यासही ते उपयुक्त आहे. हा मास्क तयार करण्यासाठी, तुम्हाला 1 टोमॅटो बारीक करून त्यात १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. तयार मास्क टॅन झालेल्या भागावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन त्वचेला डिटॉक्सिफाय करते आणि लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी टॅनिंग हलके करते.
पपई आणि मधाचा मास्क
टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही पपई आणि मध देखील वापरू शकता. त्याचा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला पपईचे 3-4 तुकडे घेऊन ते मॅश करा. मॅश केलेल्या पपईमध्ये 1 चमचा मध मिसळा आणि टॅन झालेल्या भागावर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर, थंड पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. हा मास्क त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करतो. निस्तेज त्वचेला चमकदार बनवते आणि त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते.
कोरफड आणि गुलाब पाण्याचा मास्क
गुलाबाच्या पाण्यात कोरफडी जेल मिक्स करून हे मिश्रण लावल्याने टॅनिंग दूर होण्यास मदत होते. 2 टेबलस्पून कोरफड जेलमध्ये १ टेबलस्पून गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या. हे त्वचेला हायड्रेट करण्यास आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. हे त्वचेला थंडावा देते आणि उन्हाच्या जळजळीपासून आराम देते.
बटाटा आणि दह्याचा मास्क
टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा आणि दह्याचा मास्क खूप प्रभावी आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला 1 बटाटा किसून त्यात 1 चमचा दही मिक्स करावे लागेल. ही पेस्ट त्वचेवर लावा, 15-20 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. बटाट्यामध्ये असलेले एंजाइम त्वचेला उजळवण्यास मदत करतात. त्वचा व्हाइटनिंग करण्यासाठी देखील प्रभावी आहे. हा मास्क पिग्मेंटेशन कमी करतो आणि टॅनिंग हलके करतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List