अखेर समोर आलं तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण; जाणून धक्का बसेल
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपची गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दोघांनीही 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. चाहत्यांना दोघांमधील सुंदर केमिस्ट्री देखील आवडली. नातं उघड केल्यानंतर दोघेही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण मग दोघांमध्ये असं काय झालं की, त्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला? त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्यापासून लोकांच्या मनात हाच प्रश्न घोळत आहे. आता त्यांचं वेगळं होण्याचं कारण समोर आलं आहे, जे की धक्कादायक आहे.
डिसेंबर 2024 मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्याबद्दल असे वृत्त आले होते की हे जोडपे लवकरच लग्न करू शकते आणि लग्नानंतर दोघेही मुंबईत एक घर खरेदी करतील. पण ब्रेकअपच्या बातमीने या सर्वांनाच पूर्णविराम दिला. आता या दोघांनीही त्यांचे नाते संपवून एकमेकांचे चांगले मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकअपचे कारण काय?
एका रिपोर्टनुसार तमन्ना आणि विजय यांच्यात लग्नाचा विषय आल्यापासून दुरावा निर्माण झाला. रिपोर्ट्सनुसार, तमन्ना 30 वर्षांची आहे. ती विजयसोबत लग्न करण्याबाबत फार उत्साहित होती आणि तिला हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा होता. पण यावरून त्यांच्यात वादही होत होते असंही म्हटलं जात आहे. वारंवार होत असलेले मतभेद त्यांच्या ब्रेकअपचं कारण बनलं असल्याचं म्हटलं जात आहे. पण हे एका रिपोर्टनुसार सांगितलं जात आहे. नेमकं हेच कारण आहे की अजून काही यावर मात्र दोघांनीही भाष्य केलेलं नाही.
एकमेकांना डेट करायला कधी सुरुवात केली?
सूत्रांनी सांगितले की, ‘तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा काही आठवड्यांपूर्वीच एकमेकांपासून वेगळे झाले होते, परंतु त्यांनी या नात्याचा आदर करत एकमेकांचे चांगले मित्र राहण्याचा विचार केला आहे. दोघेही आपापल्या प्रोजेक्टमध्ये, कामात व्यस्त आहेत. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी 2022 मध्ये डेटिंग सुरू केली. ते जून2023 मध्ये प्रीमियर झालेल्या नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये सुजॉय घोषच्या सेगमेंटमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर तमन्नाने अखेर एका मुलाखतीत त्यांच्या नात्याची पुष्टी केली.
‘मला असे निर्बंध आवडत नाहीत’
दरम्यान ते जेव्हा रिलेशनमध्ये होते तेव्हा त्याबद्दल विजय वर्माने सांगितले होते की त्यांना त्यांच्या भावना आता लपवायच्या नाहीयेत. म्हणून त्यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली असल्याचं त्याने म्हटलं होतं.
एका मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला होता की, “जर आम्हाला एकत्र वेळ घालवायला आवडत असेल आणि आम्ही एकमेकांना आवडत असू तर ते लपवण्याची गरज नाही. यावर आम्ही दोघेही सहमत होतो असं मला वाटतं. आणि नाते लपवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तुम्ही एकत्र बाहेर जाऊ शकत नाही, तुमचे मित्र तुमचे फोटो काढू शकत नाहीत. मला असे निर्बंध आवडत नाहीत.” असं स्पष्ट मत त्यांने व्यक्त केलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List