धनंजय मुंडेंना झालेला ‘तो’ आजार नेमकं काय खाल्ल्याने होतो? लक्षणं काय? जाणून घ्या A टू Z माहिती

धनंजय मुंडेंना झालेला ‘तो’ आजार नेमकं काय खाल्ल्याने होतो? लक्षणं काय? जाणून घ्या A टू Z माहिती

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. धनंजय मुंडेंना झालेला हा आजार नेमका काय? तो कशामुळे होतो? त्याची लक्षण काय? याबद्दलची माहिती समोर आली आहे.

बेल्स पाल्सी म्हणजे काय? (What is Bell’s Palsy)

बेल्स पाल्सी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. त्याच्या चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो. चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा अंशत: पक्षाघात होतो. यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. यामुळे तुम्हाला पापणी नीट बंद करता येत नाही. तसेच तुम्हाला एक डोळा बंद करण्यात अडचणी येऊ शकतात. हसण्यासही त्रास होऊ शकतो. बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो. योग्य औषधोपचार केल्यास २ ते ३ महिन्यानंतर आजाराची लक्षणे नाहीशी होतात.

बेल्स पाल्सीची लक्षणे काय?

  • चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा येणं
  • डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न करता येणे
  • बोलताना किंवा खाताना अडचण येणे
  • चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा सुन्न वाटणे
  • चव समजण्यास अडचणी
  • कानाजवळ वेदना
  • संवेदनशीलता वाढणे

बेल्स पाल्सी कशामुळे होतो?

बेल्स पाल्सी हा आजार जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे होऊ शकतो. अचानक थंडी लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, या व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. मधुमेह (डायबिटीज) किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे जेवणात मीठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळेही हा आजार उद्भवू शकतो. मिठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक हे चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघाताचे मुख्य कारण आहे.

उपचार काय?

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे घेणे
  • फिजिओथेरपी आणि चेहऱ्याशी संबंधित व्यायाम करणे
  • मालिश किंवा गरम पाण्याने शेक देणे
  • डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आयड्रॉप वापरणे
  • बेल्स पाल्सी काही आठवड्यांत किंवा महिन्यात आपोआप बरी होते.
  • डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर “पन्हाळगडचा रणसंग्राम, पन्हाळ गडावरून सुटका” लघुपट व 13 डी थिएटरचा शुभारंभ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…
Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव