एसटी कामगार सेनेचे कर्नाटकला ‘जशास तसे’ उत्तर! अपमानाबाबत कर्नाटकच्या चालक-वाहकांना विचारला जाब
नांदेड आगाराच्या चालक आणि वाहकांना कर्नाटकात अपमानास्पद वागणूक देल्याची घटना घडली होती. त्यानंतर एसटी कामगार सेनेचे विभागीय संघटक प्रकाश मारावार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी नांदेड एसटी आगारातील कर्नाटकातील बस चालक व वाहकांना याबाबत जाब विचारा. अखेर कर्नाटकातील तीन वाहक चालकांनी घडलेल्या घडनेबाबत माफी मागीतल्यानंतर त्यांच्या गाड्या सोडण्यात आल्या.
नांदेड बस स्थानकातून शनिवारी रात्री कर्नाटक येथील कलबुर्गी येथे गेलेल्या बसच्या कंडक्टर ड्रायव्हरचा कन्नड भाषिकांनी अपमान करत त्यांना शिवीगाळ केली होती. या घटनेची माहिती मिळताच एसटी कामगार सेनेचे विभागीय संघटक प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वखाली रविवारी नांदेड बस स्थानकात आलेल्या कर्नाटक येथील तीन बसेस अडवून कन्नडी कंडक्टर, ड्रायव्हर यांना झालेला प्रकाराचा शिवसेनास्टाईलने जाब विचारण्यात आला. तब्बल तीन तास कर्नाटकच्या बसेस अडवून कानडी भाषकांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली.
कर्नाटकात नांदेड कलबुर्गी या बसमधील ड्रायव्हर नामदेव पप्पूले, कंडक्टर संदीप किरवले यांना ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला त्याचा जाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व एसटी कामगार सेनेच्या वतीने विचारण्यात आला. कन्नडी बसेसला परमिट नसल्यामुळे त्या गाड्या थांबविण्यात आल्या. कनडी चालक वाहक यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर त्यांच्या गाड्या सोडण्यात आल्या. नांदेड आगार प्रमुख बल्लाल यांनी याप्रसंगी तात्काळ भूमिका घेऊन पोलीस प्रशासन व आरटीओ यांना कर्नाटकच्या परमिट नसलेल्या बसेस जप्त करण्याची विनंती केली.
शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश मारावार, युवा सेनेचे मनोज यादव, ज्येष्ठ शिवसैनिक भाया शर्मा, एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सुधीर पटवारी, विभागीय अध्यक्ष जय कांबळे, विभागीय सचिव सीपी कदम, नागभुषन भुसा, निखिल गल्लेवाड, सुर्यकांत चापोले, रूपेश पुयड, बाळु सुर्यवंशी, बालाजी पाटील, गोविंद फुले, बळवंत पवळे, दौलत पाटील आदींनी कन्नडी भाषिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे मागणी डेपो मॅनेजर बल्लाल यांच्याकडे केली. वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांनी कर्नाटक एसटी वाहक चालक आणि महाराष्ट्रातील एसटी वाहक व शिवसेना पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून कन्नडी वाहक चालकांना माफी मागायला लावल्यानंतर गाड्या सोडून देण्यात आल्या. यावेळी नांदेड डेपो मधील शेकडो वाहक चालक उपस्थित होते. या आंदोलनामुळे कर्नाटकच्या बसेस तीन ते चार तास नांदेड बसस्थानकातून जावू शकले नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List