‘या’ सुपरस्टारने का परत केली अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची मिठाई आणि लग्नपत्रिका?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी तर कधी एकत्र दिसल्यानेही त्यांची चर्चा होते. दरम्यान यांच्याशी निगडीत असलेला एक किस्सा सध्या व्हायरल होतं आहे. गुरु’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले. त्यांचा विवाह देखील एक खाजगी समारंभच होता, ज्यामध्ये फक्त काही निवडक लोक आले होते. पण अमिताभ बच्चन यांनी फार कोणाला आमंत्रित केल नव्हतं.
शत्रुघ्न सिन्हा अमिताभ यांच्यावर नाराज होते
पण याच प्रकारामुळे एक प्रसिद्ध सेलिब्रिटी जे अमिताभ यांचे अत्यंत खास मित्र आहे ते मात्र संतापले. ते इतके रागावले होते की त्यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नातील मिठाईही परत पाठवून दिली होती. हे अभिनेते होते शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा यांना लग्नाला बोलावलं नसल्यानं त्यांची नाराजी होती. म्हणून त्यांनी लग्नाची मिठाई आणि पत्रिका चक्क परत पाठवली नव्हती.
शत्रुघ्न सिन्हां यांना का बोलावलं नव्हतं?
जेव्हा अभिषेक बच्चनला ‘कॉफी विथ करण’ मध्ये याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा यावर अभिषेक म्हणाला होता की, लग्नाच्या वेळी त्याची आजी तेजी बच्चन आजारी होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. म्हणूनच कमी लोकांना बोलावण्यात आले होते.
त्यामुळे नंतर बच्चन कुटुंबाने नंतर सर्वांच्या घरी मिठाई पोहोचवून आशीर्वाद घेतले गेले, मात्र शत्रुघ्न सिन्हांनी नाराजी व्यक्त करत मिठाई आणि पत्रिका परत केली. अभिषेक म्हणाला की,”आम्ही तेव्हा ते त्यांनी पाठवलेली मिठाई आणि पत्रिका पुन्हा स्वीकारले कारण तुम्ही सर्वांना खूश करू शकत नाही. ते खूप दिग्गज व्यक्ती आहे, चांगला माणूस आहे आणि त्याला आपले विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे”
‘लोक आयुष्यभर त्रास देऊ शकतात…’
पुढे अभिषेक म्हणाला की, “जर तुम्ही तुमच्या लग्नात एखाद्या खास नातेवाईकाला आमंत्रित करायला विसरलात तर त्याचे टोमणे तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतात. हे केवळ सामान्य लोकांच्या जीवनातच नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही हे घडतं.” असं म्हणतं शत्रुघ्न यांनी त्यावेळेची परिस्थिती समजून घ्यायला हवी होती असं अभिषेकचं म्हणणं होतं.
शत्रुघ्न सिन्हा यांनी मिठाई का परत केली?
शत्रुघ्न सिन्हा यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल स्पष्टपणे हे सांगितलही होतं, “अमिताभ बच्चन म्हणाले होते की लग्नाला आमंत्रित न केलेले लोक मित्र नव्हते. मग जेव्हा तू मला बोलावलं नाहीस तेव्हा मिठाई कशासाठी? मला मिठाई पाठवण्यापूर्वी अमिताभ किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही एकदा फोन करून ही परिस्थिती सांगितली असती तर मला काहीच वाटलं नसतं. पण जेव्हा कोणीही ते केले नाही, तेव्हा मिठाईचा काय अर्थ आहे?” असं म्हणतं मित्रावरचा राग त्यांनी स्पष्टपणेच व्यक्त केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List