स्वारगेट महिला अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, या गंभीर त्रुटीमुळे घटना घडल्याचा दावा…
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात रिकाम्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. पुणे – स्वारगेट या वर्दळीच्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. या शिवशाही बसेस या तत्कालिक परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून महामंडळात साध्या तिकीट दरात सर्वसामान्यांना वातानुकूलित प्रवास घडविण्यासाठी या बसेस महामंडळात दाखल झाल्या होत्या. या बसेस अनेक ठिकाणी ‘विनावाहक’ चालविण्यात येत असतात. त्यामुळे चालकाने ही बस येथे पार्क केल्यानंतर तिला लॉक केले नसल्याने आरोपी दत्तात्रय गाडे याने कंडक्टर असल्याचा बनाव करुन या तरुणीला बसमध्ये नेत फसविल्याचे उघडकीस आले आहे.
एसटी महामंडळाच्या सोलापूर आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0319 ही बस सोलापूर ते स्वारगेट पुणे या मार्गावर धावत होती, ही बस सोलापूर ते स्वारगेट पुणे ( विना वाहक ) होती.या बसचा चालक शंकर लालू चव्हाण यांनी काल रात्री 3.40 वाजताच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात आणली. चालकाने ही बस स्वारगेट बस स्थानकात रसवंतीगृह समोर लावली होती. सकाळी अंदाजे 06:00 वाजताच्या दरम्यान एका इसमाने बसचा वाहक असल्याचे भासवून एका महिला प्रवाशाला या बसमध्ये गेले आणि तिच्यावर अत्याचार केले. या महिला प्रवाशाच्या जबाबानंतर आता संशयित आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.
दत्ता गाडे याच्या भाऊ ताब्यात
पुण्यातील स्वारगेट येथे शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दत्तात्रय गाडे असे आहे. दत्ता गाडे हा पुण्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दत्ता गाडे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर आणि शिरुर पोलिसांत गुन्ह्यांची नोंद आहे.त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या शिरुर येथील घरावर देखील पोलिसांनी छापा टाकला आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी आणि हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देखील त्याचा शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List