राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी?
फिल्म इंडस्ट्रीमध्ये राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटलं जातं. कारण कधी आणि कसं लाइमलाइटमध्ये यायचं हे तिला चांगलं माहीत आहे. आता राखी सावंतच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.पाकिस्तामध्ये राहणाऱ्या 58 वर्षांच्या मुफ्ती अब्दुल कवी यांची राखीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी तसा प्रस्ताव देखील ठेवला होता. मात्र राखी सावंत या नात्यासाठी फारशी उत्सुक दिसली नाही. मात्र आता ती पुन्हा एकदा पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रेमात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. ती सध्या पाकिस्तानी अभिनेता डोडी खान याच्यासोबत दुबईत पार्टी करत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावेळी देखील राखी सावंत ही दुबईमध्येच होती. राखी सावंतने विराटच्या शतकाची देखील भविष्यवाणी केली होती. आता तीने डोडीच्या नावाची अंगठी आपल्या हातात घातली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अभिनेता डोडी हा राखी सावंतसाठी एक सुंदर अशी डायमंडची अंगठी घेऊन येताना दिसत आहे. त्यानंतर त्याने ही अंगठी राखी सावंतला घातली आणि आम्ही चांगले मित्र असल्याचं म्हटलं.या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांच्या कमेंट येत आहेत. यातील एकाने कमेंट करताना म्हटलं आहे की, या दोघा ड्रामेबाज व्यक्तींना ड्रामेबाजीचं मेडल मिळायला पाहिजे.
ड्रामा क्वीन राखीने डोडी खानच्या हातानं आपल्या बोटामध्ये अंगठी घातली. मात्र मैत्रीच्या नात्यानं, त्याने यापूर्वीच राखीसोबत लग्न करण्यास नकार दिला आहे. आता त्या दोघांनाही आपली मैत्री वाढवण्याची इच्छा आहे. डोडी खानने राखीची समजूत घातली आहे. त्याने राखीला अंगठी देताना आपण कायम एक चांगले मित्र राहू असं त्याने म्हटलं आहे, यावेळी बोलताना राखीने त्याला सांगितलं की मी फक्त डायमंडची रिंग घालते, त्याने तिच्यासाठी खास डायमंडची रिंग ऑडर केली. ही अंगठी आपल्या हातात घातल्यानंतर तीने तिच्या आईला उद्देशून म्हटलं आहे की आई पुन्हा एकदा माझा प्रेमभंग झाला, माझं लग्न तुटलं.
यावर बोलताना राखी सावंतने म्हटलं की, मी आणी डोडी खूप जुने मित्र आहोत. सध्या दोन्ही देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. मात्र मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, त्यामुळे मी पाकिस्तानचीच सून बनणार आहे. पण डोडी हा माझा फक्त एक चांगला मित्र आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List