शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…

शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…

कॉलेस्ट्रॉलचे नाव ऐकून आपल्या डोक्यात एक गोष्ट नेहमीच येते की हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. वास्तविक कॉलेस्ट्रॉल आरोग्यदायी पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. परंतू याचे प्रमाण जेव्हा वाढू लागते तेव्हा मात्र हृदय रोगाचा धोका वाढतो. शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढल्याचे कसे ओळखायचे याची लक्षणे नेमकी काय आहेत हे आपण पाहूयात. त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी पाहून तुम्हाला त्याला नियंत्रण करताना मदत होऊ शकते. या पोस्टमध्ये आपण शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत कसे मिळतात हे पाहूयात…

कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण काय ?

शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढण्यास अनेक घटक जबाबदार असतात. उदाहरणार्थ चरबी युक्त आहार, व्यायाम न करणे, वाढलेले वजन, धुम्रपान आणि मद्यपान, काही जणात तर अनुवांशिक कारणाने वजन वाढत असते. त्यामुळे अनुवांशिक पद्धतीने जर वजन वाढत असेल तर कारणांचा आपल्याला अंदाजच येत नाही.

उच्च कॉलेस्ट्रॉलची लक्षणे काय ?

1। जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जादा असेल तर त्याच्या त्वचेवर याची लक्षणे लागलीच दिसू लागतात. त्यांच्या त्वचेवर पिवळे ठीपके आणि गाठी दिसू लागतात. या गाठी डोळ्याच्या खाली आसपास कोपर आणि गुडघ्यावर असतात ही कॉलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे असतात…

2। तसेच हाता पायांवर देखील कॉलेस्ट्रॉल वाढल्याची काही लक्षणे दिसू लागतात. जेव्हा शरीरात प्रमाणाच्या बाहेर कॉलेस्ट्रॉल जमा होते. तेव्हा शरीरातील नसा आखडल्या जातात आणि रक्त प्रवाह कमी होऊ लागतो. यामुळे कोणतीही शारीरिक कृती करताना हाता पायात मुंग्या येतात आणि हातपाय आखडू लागतात.

3। उच्च कॉलेस्ट्रॉल पचन यंत्रणेत देखील समस्या निर्माण करते. त्यामुळे पित्ताशयाच्या पिशवीत दगड होतात. तसेच पोटात वरच्या बाजूला उजवीकडे दुखू लागते.

4। शरीरात उच्च कॉलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये प्लाक जमा होऊ लागते आणि रक्तप्रवाह बाधित होऊ शकतो. यामुळे छातीत दुखू लागते. म्हणजे वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलच्या सर्वसामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

5। प्लाकमुळे धमन्या फाटू शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे हृदय आणि मस्तिष्क प्रभावित होऊ शकते त्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रोक आल्यानंतर शरीर सुन्न होऊ शकतो. बोलताना नेहमी त्रास होऊ शकतो.

कॉलेस्ट्रॉलला कसे नियंत्रित करावे ?

– तुमच्या आहारातील चरबीचे प्रमाण मर्यादित करावे, तसेच प्रोसेस्ड आणि जंक फूड पासून दूर राहावे

– सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आहारात ओमेगा 3 फॅटी एसिडला सामील करावे. ही एक आरोग्यपूर्ण चरबी असते. ही खराब कॉलेस्ट्रॉला कमी करण्यात मदत करते.

– तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढते. कॉलेस्ट्रॉलची पातळीचा स्तर नियंत्रित करण्यास मदतगार आहे.

– या शिवाय रोज नियमित रूपाने व्यायाम करावे. तुमचे वजन आरोग्यपू्र्ण होऊ शकते. थोडे वजन कमी केल्याने कॉलेस्ट्रॉलचा स्तर चांगल्या प्रकारे सुधारू शकतो.

– धूम्रपान आणि मद्य सेवनापासून दूर रहावे, त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चंद्रावर सुरू होणार मोबाईल आणि इंटरनेट सेवा, NOKIA सह NASA लॉन्च करणार मिशन चंद्रावर सुरू होणार मोबाईल आणि इंटरनेट सेवा, NOKIA सह NASA लॉन्च करणार मिशन
चंद्रावर मानवी वसाहत आणि रस्ते-रेल्वे नेटवर्कच्या तयारीदरम्यान अमेरिकन अंतराळ संस्था नासा मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. यासाठी नासाने...
स्वारगेट महिला अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, या गंभीर त्रुटीमुळे घटना घडल्याचा दावा…
राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी?
शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…
महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते राजकारणातून हद्दपार होणार? केंद्र सरकारने मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू
स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवसेनेचा दणका, वसंत मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन