ना बोनी कपूर ना मिथुन चक्रवर्ती, ‘या’ सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास
आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूडमधील सुपरस्टार दिवंगत अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. तिने बॉलिवूडचा एक काळ चांगलाच गाजवला होता. श्रीदेवी तिच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. श्रीदेवीने जेव्हा विवाहित असलेल्या बोनी कपूर यांच्याशी लग्न केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. पण श्रीदेवीच्या आयुष्यात एक अभिनेता असा होता ज्याच्यासाठी श्रीदेवीने ७ दिवसांचा उपवास केला होता. आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
कर्नाटकातील एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजी राव गायकवाड या अभिनेत्याबद्दल माहिती आहे का? हा अभिनेता भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. ज्याला अनेक लोक देव मानतात. हा तोच अभिनेता आहे, ज्याच्यासाठी श्रीदेवीने एकदा सात दिवस उपवास केला होता. मिथुन चक्रवर्तीसह अनेक स्टार्ससोबत श्रीदेवीचे नाव जोडले गेले असले होते. पण तिने बोनी कपूरसोबत लग्न केले. हा किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे की आणखी एक सुपरस्टार होता जो श्रीदेवीवर जीव ओवाळून टाकत होता.
आम्ही ज्या शिवाजी राव गायकवाडबद्दल बोलत आहोत ते दुसरे कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आहेत. त्यांचे खरे नाव शिवाजी आहे. एक काळ असा होता जेव्हा रजनीकांत पोर्टरपासून बस कंडक्टरपर्यंत काम करत होते. पण त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. आज ते देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत.
रजनीकांत यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरस्टार महिलांसोबत काम केले आहे. पण त्यांची आणि श्रीदेवीसोबतची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. दोघांनी तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी अशा चार भाषांमधील १९ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे श्रीदेवीनेही रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती. वास्तविक, तिचा पहिला चित्रपट ‘मुंद्रू मुदिचू’ होता. ज्यामध्ये १३ वर्षांच्या श्रीदेवीने रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती. या दोन सुपरस्टार्समध्ये चांगली मैत्री होती आणि रजनीकांत यांना श्रीदेवी खूप आवडत असल्याचे देखील म्हटले जाते.
रजनीकांत आणि श्रीदेवी यांचे नाते खूप जुने होते कारण रजनीकांत यांचे श्रीदेवीच्या आईसोबतही चांगले संबंध होते. श्रीदेवी रजनीकांत यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान होती. त्यामुळे त्यांनी तिची खूप काळजी घेतली. एकत्र काम करत असताना रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. एकदा तर श्रीदेवीच्या आईशी त्यांच्या लग्नाबद्दल बोलले होते. तेव्हा श्रीदेवी केवळ १६ वर्षांची होती.
डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘राणा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रजनीकांत खूप आजारी पडले होते. त्यांची प्रकृती फारच वाईट होती. श्रीदेवीला जेव्हा हे समजले तेव्हा ती देखील तणावात आली होती. तिने रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवात केली. श्रीदेवी यांनी रजनीकांत यांच्यासाठी सात दिवस उपवास केला. ती रजनीकांतबद्दल खूप काळजी करत असे. श्रीदेवीने शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जाऊन ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली होती. तिची प्रार्थना देवाने ऐकली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List