11 दिवसांत 47 चित्रपट साइन करणारा अभिनेता, ज्याच्या एका चुकीमुळे शाहरुख खान बनला रातोरात स्टार, अभिनेत्याला आजही पश्चाताप
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केलं आणि आजही त्याचा प्रभाव, त्याची क्रेझ कमी झालेली नाहीये. शाहरूखने त्याचं यश त्याच्या मेहनतीवर मिळवलेलं आहे. आणि जसा एका चित्रपटात शाहरूखचा डायलॉग आहे, “कहते हैं किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है” अगदी याच प्रमाणे त्याची बॉलिवूड गाजवण्याची इच्छा पूर्ण झाली आणि तो बॉलिवूडचा बादशाह, किंग खान बनला.
‘डर’ चित्रपटाने शाहरूखचं नशीबच बदललं
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ चित्रपटापासून शाहरूखने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘किंग अंकल’ आणि ‘बाजीगर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या सर्व चित्रपटांमधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. ‘बाजीगर’ चित्रपटाने त्याला एका रात्रीत स्टार बनवलं.
खलनायकाची भूमिकाही पसंतीस उतरली
त्यानंतर 1993 मध्ये ‘डर’ चित्रपट प्रदर्शित झाला, जो यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आणि शाहरूखला एक वेगळीच ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका करुनही तो सुपरस्टार झाला, या चित्रपटातील त्याचे डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत.
पहिल्यांदा राहुल रॉयला ऑफर झाला होता चित्रपट
पण ही गोष्ट फार कमी जणांना माहित असेल की, या चित्रपटासाठी शाहरुख ही पहिली पसंती नव्हती, तर 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता राहुल रॉयला पहिल्यांदा हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला, त्यानंतर शाहरुख खान या चित्रपटाचा भाग बनला आणि प्रसिद्ध झाला.
चित्रपट नाकारल्याचा आजही त्याला पश्चाताप
राहुल रॉयने एकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याबाबत खुलासा केला होता. ‘डर’ मधील शाहरुखची भूमिका त्याच्यासाठीच लिहिली गेली होती. मात्र हा चित्रपट नाकारून त्याने खूप मोठी चूक केली आणि आजही त्याला हा चित्रपट करू न शकल्याचा पश्चात्ताप होत असल्याचं त्याने म्हटलं होतं.
11 दिवसांत 47 चित्रपट साइन केले
राहुल रॉय आता चित्रपटांपासून दूर असला तरी एक काळ असा होता जेव्हा लोक त्याला खूप पसंत करत असत. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटापासून त्याने फिल्मी करिअरला सुरुवात केली. या रोमँटिक-संगीतमय चित्रपटाने तो रातोरात स्टार झाला. ‘आशिकी’ नंतर त्याचे नशीब एवढं पलटलं होतं की त्याने चक्क 11 दिवसांत 47 चित्रपट साइन केले होते.
या स्टार्सनाही मिळाली होती ऑफर
शाहरुख खानच्या आधी सलमान खान आणि आमिर खान यांनाही ‘डर’ची ऑफर मिळाली होती, परंतु नकारात्मक भूमिकेमुळे या दोन्ही सुपरस्टारनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. शाहरुख खानला त्याच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्यात ‘डर’ चित्रपटाचा मोठा वाटा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List