लाडकी बहीण योजनेसाठी 5 लाख महिला अपात्र; ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

लाडकी बहीण योजनेसाठी 5 लाख महिला अपात्र; ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, आता त्यांना या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ मिळणार नाहीये. या मुद्द्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता असून, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

आता येताना बातमी वाचली पाच लाख महिलांना अपात्र केलं, मत मिळाली आता अपात्र. या महिलांनी जाऊन तीन-तीन भावांना विचारलं पाहिजे आम्ही का अपात्र?  तेव्हा भाऊ गर्दी झाली होती. जॅकेट भाऊ हा भाऊ, तो भाऊ. दीड दीड हजार रुपये देऊन मत दिली, हार जीत होत असते. जीत तर आपली आहे हीच खरी शिवसेना आहे. जे आहेत त्यांची इतिहासात गद्दार म्हणूनच ओळख राहील, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तीला भिकेचे डोहाळे लावायचं काम हे करत आहेत. कोस्टल रोड केलेला आहे, ना मोदींनी पैसा टाकलाय, ना  फडणवीसांनी पैसा टाकलाय. हा आपला पैसा होता. त्यावेळेला इंग्रजांना मुंबई आदंन दिली होती आता अदानींना दिलेली आहे. आज माझ्या हातात काहीच देण्यासारख नसेल पण शिवसेनाप्रमुख म्हणायचे तेच सांगतोय नोकरी मागणारे होऊ नका तर नोकरी देणारे व्हा. हे जे आहेत त्यांच अस्तिव जास्त दिवस नाही हे लक्षात ठेवा, जोपर्यंत दिल्लीतून टॉर्च मारला जातोय तोपर्यंतच ते आहेत, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुण्यात GBS आजाराने थैमान घातलं आहे.  यावर विचारायचं कोणाला कारण महानगर पालिका अस्तित्वात नाही. पुणे जे भाजपकडे होत आता का उत्तर देत नाहीत. नगरविकास खात त्यांच्याकडे आहे मग ते का उत्तर देत नाहीत? अजून किती आजार वाढवायचा आहे. की फक्त काही मिळाल नाहीतर गावात जातोस आणि रेडा कापतोस. रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू, असं म्हणत त्यांनी यावेळी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली? 500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली?
अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल...
सिनेमा मराठीत का बनवला नाही? स्क्रिप्ट चांगली नाही; ‘छावा’ सिनेमावर मराठमोळ्या अभिनेत्रीची टीका
‘छावा’ सिनेमाला यश, विकी कौशल पोहोचला 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात, असं केल्यानं पूर्ण होतात सर्व मनोकामना
‘तो बॅटिंग करत नव्हता तरीही…’, धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट
नगर अर्बनच्या घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट कसे? मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलली पाहिजेत
अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण हटाव सुरूच राहणार! दोन हजारांचा दंड करणार
वाईतील दोघांनीच दिली मुंबईतील चोरट्यांना टीप,सराफ बाजारातील चोरीचे गुढ उकलले; चौघांना अटक