बांगलादेश सरकार नट्यांच्या मागे हात धुवून लागलं… मेहरनंतर ‘या’ अभिनेत्रीविरोधात ॲक्शन; थेट तुरुंगातच डांबलं
भारताचा शेजारी देश बांगलादेशात सध्या मोठी अराजकता माजली आहे. देशात अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिला अटक करण्यात आली. त्यानंतर लागलीच सोहाना सबा हिला पण पोलीसांनी ताब्यात घेतले. गुप्तहेर पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.
सोहाना सबा ही पण लोकप्रिय नटी आहे. ढाका मेट्रोपॉलिटन पोलीस उपायुक्त मुहम्मद विल्बर रहमान यांनी गुरुवारी रात्री तिच्या अटकेची माहिती दिली. त्यापूर्वी पोलीसांनी मेहर अफरोज शॉन हिला ढाका येथील धनमंडी परिसरातून अटक केली.
गुप्तहेर खात्याचे पोलीस प्रमुख रेजाऊल करीम मल्लिक यांनी मेहर हिच्यावर देशाविरोधात कट कारस्थान रचण्याचा आरोप केला आहे. तिची मिंटो रोडवरील गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List