कोपरीकरांनो बिनधास्त चिकन, अंड्यावर ताव मारा; बर्ड फ्लूची धास्ती संपली; दुकाने उघडली
कोपरीकरांनो आता बिनधास्त चिकन, अंड्यावर ताव मारा. कारण शहरात बर्ड फ्लूची धास्ती संपली असून चिकन, अंड्याची दुकाने उघडली आहेत. ठाणे महापालिका हद्दीत आता बर्ड फ्लूच्या एकही केसेस आढळून आल्या नसल्याने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी उठवली आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर एक किलोमीटर क्षेत्रात सर्वच कोंबड्यांचे मांस व अंडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता. या दोघांचेही मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पालिकेला प्राप्त होता. त्यामुळे कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि अंडी विक्रीला 5 फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर भरारी पथके नेमून शहरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्या नसल्याने चिकन आणि अंड्याची विक्री सुरू करण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.
75 नमुने पालिकेने घेतले
सर्वेक्षण क्षेत्रात सर्व अंडी व चिकन मांस विक्रेते यांना स्वच्छता बाळगण्याबाबत समज देण्यात आली होती. भरारी पथकाने एक किलोमीटर क्षेत्रातील 21 ब्रॉयलर कोंबड्या व 200 अंडी नष्ट केली होती. त्यानंतर 15 ते 17 जानेवारीला सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण 127 ठिकाणी तपासणी करण्यात आली तर 75 नमुने पालिकेने घेतले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List