कुठे गेला रणवीर अलाहाबादिया? घर बंद, फोन बंद; पोलिसांची सर्वत्र शोधाशोध पण संपर्कच होईना
समय रैना आणि रणवीर अलाहाबादियावरील संकट अजूनही टळलेलं नाही. त्यांची पोलीस चौकशी सुरु आहे. पालकांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबदद्ल रणवीर अलाहाबादिया, समय रैना, त्याचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट आणि या शोच्या संबंधीत इतर सदस्यांवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान एक एक करून सर्वांची पोलीस चौकशी सुरु आहे.
समयला पोलिसांकडून दिलासा
दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी समय रैनाला पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तो सध्या शोसाठी अमेरिकेत असल्याने तारीख वाढवून देण्याची तसेच मार्चपर्यंत वेळ देण्याची विनंती त्याने पोलिसांना केली होती.
मात्र आधी पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून त्याला थोडा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे आता समयला तात्पुरता का असेना पण दिलासा मिळाला आहे.
समय रैनाला 10 मार्चपर्यंत वेळ
मुंबई पोलिसांनी समयला त्याच्या शोसाठी. हा वेळ दिल्याचं बोललं जात आहे. एका रिपोर्टनुसार, समयच्या वकिलाच्या विनंतीवरून त्याला 10 मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर त्याला काहीह करून पोलीस चौकशीला हजर राहावं लागणार असल्याचं बोललं जात आहे. समय रैनाने सांगितले होते की 16 आणि 20 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत त्याचा एक कार्यक्रम आहे.तसेच त्याचा मार्चमध्येही एक शो आहे. त्याच्या या शेड्यूलनुसार त्याला वेळ देण्यात आला आहे.
आसाम पोलिसांकडून मात्र अॅक्शन जारी
मात्र जरी समय रैनाला मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला असला तरी, आसाम पोलिसांनी त्याला अद्याप वेळ दिलेला नाही. त्याच्याविरुद्ध गुवाहाटीमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यासाठी त्याला 18 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी पोलिस मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत त्याला वेळ मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
रणवीर अलाहाबादियाचा फोन बंद, घरही बंद
समयसोबतच पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसानी रणवीरला दोनदा सन्मस पाठवला आहे. मात्र त्याच्याकडून काहीही प्रतिक्रिया आली नसल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान जबाब घेण्यासाठी त्याने पोलिसांना त्याच्या घरी येण्याची विनंती केली होती. त्याने आपल्या सुरक्षेचा हवाला देत ही विनंती केली होती, मात्र पोलिसांनी त्याची मागणी फेटाळली असून त्याला पुन्हा समन्स बजावले. मात्र त्याची काहीही प्रतिक्रिया आली नाही. अखेर पोलीस त्याच्या वर्सोवा येथील घरी गेले असात ते बंद होते आणि रणवीर तिथे नव्हता.
याचा अर्थ रणवीर अजूनही पोलिसांच्या संपर्कात नसून त्याचा फोनही बंद येत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रणवीर आता कुठे आहे हे कोणालाही माहिती नाहीये. तो भारतात आहे की अजून कुठे याबद्दलही कोणाला माहित नसल्याचं बोललं जात आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List