कुठं पळाला रणवीर अलाहबादिया? फोन बंद, घराला कुलूप, हैराण पोलीस यंत्रणा
समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट मध्ये माती कालवणारा युट्यूबर रणवीर अलाहबादीया पळपुटा निघाला. आई-वडीलासंबंधी अश्लाघ्य टीका करणारा रणवीर अलाहबादिया याने समाज माध्यमावरच माफीचा ड्रामा रंगवला. पण तो अचानक गायब झाला आहे. त्याचा फोन बंद आहे, तर घराला सुद्धा भलं मोठं ताळं लागलंय.
या शोवर त्याचे खरं रूप समोर आले. एरव्ही ज्ञान पाझळणाऱ्या या युट्यूबर्सने जे वर्तन केले ते सर्वांनाच धक्कादायक होते. त्याने अक्कलेचे तारे तोडल्याने त्यांचे प्रशंसक सुद्धा अवाक झाले.
त्याने या शो मध्ये एका कंटेस्टेंटला त्याच्या आई-वडिलांच्या प्रणयाबद्दल प्रश्न केला. त्यानंतर अश्लाघ्य कमेंट केली. त्यानंतर इंटरनेटवर त्याच्या चाहत्यांनीच नाही तर धार्मिक संघटना, राजकीय नेते त्याच्यावर तुटून पडले.
त्याच्यावर देशातील विविध राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरोधात संसदेत सुद्धा आवाज उठवण्यात आला. सुप्रीम कोर्टात सुद्धा त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List