व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी कंगना रानौतच्या हॉटेलचे शानदार ओपनिंग, व्हेज थाळी कितीला ?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत यांचं ‘द माउंटन स्टोरी’ हे रेस्टॉरंट काल व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सुरू झालं. या रेस्टॉरंटमध्ये पहाडी व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळीदेखील मिळते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कंगनाच्या रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांची गर्दी कमी होती. काही दिवसांपूर्वी, 19 जानेवारीला कंगना यांनी मनालीचे प्रसिद्ध पंडित नितीन शर्मा यांच्याकडून तिच्या रेस्टॉरंटची पूजा केली होती. 14 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी ना पूजा झाली ना रिबन कटिंग. कंगना या 11 वाजण्याच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये येतीलईल असे पूर्वी सांगितले जात होते, मात्र तसे झाले नाही. पण ग्राहक येताच हॉटेलची सेवा सुरू झाली. व्हेज थाळी 680 रुपयांना तर नॉन व्हेज थाळी ही 850 रुपयांना आहे.
नाश्त्यात काय मिळणार ?
रेस्टॉरंटमध्ये न्याहारीसाठी, तुम्हाला सिड्डू, स्टफ्ड तंदूरी आलू पराठा, आलू पुरी, पोहे, वडापाव, पकोडा , भजी, स्ट्रीट स्टाइल नूडल्स आणि शूटिंग कटिंग चहा मिळेल.
व्हेज थाळीतही विविध पदार्थ
पहाडी व्हेज थाळीमध्ये मूग डाळ विथ राईस, माह की दाल, दम मद्रा, कद्दू का खट्टा, कढी पकोडा आणि मटर पनीर सोबत भात, लच्छा पराठा, बटर नान आणि बदना गोड यांचा समावेश असेल. व्हेज थाळी 680 रुपयांना आहे.
नॉन व्हेज मध्ये पहाडी चिकन
पहाडी नोज व्हेजमध्ये पहाडी चिकन आणि पहाडी जंगली मटण सोबत भात, लच्छा पराठा बटर नान आणि बदना मिठा यांचा समावेश असेल. नॉन व्हेज थाळी ही 850 रुपयांमध्ये असेल.
पदार्थांच्या क्वॉलिटीवर विशेष लक्ष
जेवणाच्या दर्जावर विशेष लक्ष दिले जाईल, असे अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौतने सांगितलं होतं. मी स्वत: क्लासिक आहे. इटली हे माझं आवडते ठिकाण आहे. अनेक देश फिरण्याची संधी मिळाली. मला अमेरिकन बर्गर खूप आवडतात. मात्र त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये हिमाचली खाद्यपदार्थांना प्राधान्य देण्यात आले आहे, असे तिने नमूद केलं.
सोशल मीडियावरही पोस्ट
काही दिवसांपूर्वी कंगना यांनी हे हॉटेल उघडणार असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. स्वत:चं रेस्टॉरंट उघडून खूप आनंद झाल्याचं तिने नमूद केलं. तसेच त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत तिने आनंदही व्यक्त केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List