रणधीर कपूर जावयाला ‘थर्ड क्लास आदमी…’ म्हणाले तेव्हा…, पण का?
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांनी अनेत हीट सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली. पण प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ते स्वतःची ओळख निर्माण करू शकले नाही. पण रणधीर कपूर यांच्या मुलींनी बॉलिवूड गाजवलं आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकात सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिचा बोलबाला होता. बॉलिवूडमध्ये करिश्माने एका पेक्षा एक सिनेमे दिले आणि यशाच्या शिखरावर पोहोचली. पण अभिनेत्रीने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे.
करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचं नाव बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्यासोबच करिश्माचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर कुटुंबियांच्या पसंतीने करिश्मा उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं.
लग्नाच्या काही दिवसांनंतर अभिनेत्रीवर अत्याचार होण्यास सुरुवात झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री संजय याने करिश्माची त्याच्या मित्रांसोबत बोली लावली होती. शिवाय सासूने अभिनेत्रीला मारहाण केली होती. अशात दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.
घटस्फोटादरम्यान, फक्त करिश्मानेच संजय कपूर याच्यावर आरोप केले नाहीतर, वडील रणधीर कपूर यांनी देखील मोठ्या जावयासाठी वाईट शब्द वापरले होते. एका मुलाखतीत रणधीर कपूर म्हणाले होते, ‘कपूर कुटुंबाला सर्वत्र मान आहे. आम्हाला कोणाच्या संपत्तीची गरज नाही. आम्ही आमच्या कौशल्याच्या जोरावर गडगंज पैसा कमावला आहे… संजय कपूर हा थर्ड क्लास माणूस आहे…’ असं रणधीर कपूर म्हणाले होते…
फक्त रणधीर कपूर यांनीच नाहीतर, करीनाने देखील बहिणीच्या घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली, ‘करिश्माच्या आयुष्यातील हा कठीण काळ प्रचंड कठीण आहे. करिश्माच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा होत आहे. पण तिच्या आयुष्याबद्दल मी सर्वांसमोर कधीच बोलत नाही. मी माझ्या बहिणीसाठी प्रॉटेक्टिव्ह आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती…
करिश्मा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर करिश्मा एकटीच मुलाचा सांभाळ करत आहे. रिपोर्टनुसार, करिश्मा संजय कपूर याची दुसरी पत्नी होती. घटस्फोटानंतर संजय याने दुसरा संसार थाटला. तर करिश्मा हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्री मुलगी आणि मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List