देशात प्रथमच मुंबईत होणार समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती, नेमका कसा असणार हा प्रकल्प
Mumbai News: देशात विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे वीज निर्मितीचे विविध पर्याय शोधले जात आहेत. पवन उर्जा, सौर उर्जा यासारख्या अक्षय उर्जा प्रकल्पांवर भर दिला जात आहे. परंतु त्यापेक्षा वेगळा प्रयोग मुंबईत होणार आहे. मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारचे स्वामित्व असलेली भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (बीपीसीएल) हा प्रकल्प सुरु करणार आहे. त्यासाठी इस्त्रायलच्या कंपनीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीची देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट मुंबईत होत आहे.
दिल्लीत ‘इंडिया एनर्जी वीक’ (IEW) कार्यक्रम झाला. त्यात देशाच्या वाढत्या इंधन आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या अंतर्गत बीपीसीएलने मुंबई महासागरासारख्या समुद्र किनारी अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीचे नियोजन केले आहे.
इस्त्रायल कंपनी वेव पॉवरसोबत करार होणार
बीपीसीएल आणि इस्त्रायलची इको वेव पॉवर या कंपनीत समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती प्रकल्पाबाबत करार होणार आहे. मुंबईच्या समुद्र किनारी 100 किलोवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. इस्त्रायलमध्ये इको पॉवर कंपनीने हा प्रकल्प यशस्वी केला आहे. यासंदर्भातील करारावर या आठवड्यात हस्ताक्षर होण्याची शक्यता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कोणत्या देशांमध्ये सुरु आहे प्रकल्प
इस्त्रायलच्या तेल अवीवमध्ये मुख्यालय असलेली इको वेव पॉवरने काही देशांमध्ये समुद्रांच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प यशस्वी केला आहे. त्यात इस्त्रायल, स्पेनमधील जिब्राल्टर , पुर्तगाल या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी पाच ते 20 मेगावॅट वेव एनर्जी प्रकल्प सुरु आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईतील समुद्र किनारी वीज निर्मिती केली जाणार आहे.
भारतात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वीज उत्पादनाचे नवनवीन पर्याय शोधले जात आहेत. सध्या सौरऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यावर भर दिला जात आहे. परंतु सूर्यास्तानंतर सौर उर्जेची उत्पादनक्षमता कमी होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List