मोठी बातमी! धनंजय मुंडेंची भेट का घेतली? सुरेश धसांनी सांगितली आतली बातमी
मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्यानंतर तब्यतीची चौकशी करण्यासाठी सुरेश धस यांनी मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, या भेटीनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी त्यांना दिवसा त्यांच्या स्वत:च्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची विचारपूस आणि लढा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, त्यात गैर काय? असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख आणि धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे भेटीत काही गैर नसल्याचं धस यांनी म्हटलं आहे.
अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. आपन तब्येतीची विचारपूस करण्यासाठी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं धस यांनी म्हटलं आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीवर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. धस आणि मुंडे यांची ही भेट दुर्दैवी असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सुरेश धस यांनी भेटीसाठी अजित पवार यांच्याकडे वेळ मागितला होता, मात्र त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी बातमीही समोर आली होती. मात्र सुरेश धस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मी अजित पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली नव्हती, काल वेळ मागितली होती, मात्र मला भेटता आले नाही, त्यानंतर मी वेळ मागितली नाही, असं धस यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List