पंढरीनाथ सावंत यांची आज शोकसभा
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणगावची जडणघडण आणि मराठी नियतकालिकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सिद्धहस्त लेखक, निर्भीड आणि ध्येयवादी पत्रकार हरपला. पंढरीनाथ सावंत यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. ही शोकसभा उद्या शुक्रवारी सायंकाळी 6.45 वाजता मम्माबाई हायस्कूल हॉल, व्होल्टास सागरजवळ, नप्पू हायस्कूलसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, काळाचौकी येथे होईल. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List