Aishwarya Rai : गर्लफ्रेंडसोबत प्रोड्यूसरच असं वागणं बघून ऐश्वर्या रायने सोडला चित्रपट, अभिनेत्रीने गुपित उलगडलं
ऐश्वर्या राय बॉलिवूडमधली ती अभिनेत्री आहे, जिने नेहमीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. ऐश्वर्या रायने एकदा एक चित्रपट सुद्धा याच कारणासाठी सोडला होता.
चित्रपटाचा प्रोड्यूसर त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करायचा, हे ऐश्वर्याला पटलं नाही. अभिनेत्री फ्लोरा सैनीने 2018 मध्ये बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलेला. ज्यावेळी कोणी तिच्यासोबत काम करायला तयार नव्हतं, तेव्हा ऐश्वर्या रायने तिला सपोर्ट केलेला.
फ्लोराने सांगितलं की, ऐश्वर्या फक्त सपोर्ट करुनच थांबली नाही, तर तिने तो चित्रपटही सोडला, जो माझा एक्स बॉयफ्रेंड प्रोड्यूस करत होता. मला होणारी मारहाण ऐश्वर्याला पटत नव्हती.
मी, जेव्हा जाहीरपणे त्या अत्याचारांबद्दल बोलली, तेव्हा मला वाटलं मी चूक केली, कारण कोणी मला काम देत नव्हतं" असं फ्लोरा सैनी म्हणाली. "माझ्या कुटुंबात मीच कमावती होते. माझ्यासाठी पैसे कमावणे खूप कठीण बनलं होतं. कुठलाही सपोर्ट नव्हता. त्यावेळी फक्त ऐश्वर्या माझ्यासोबत उभी राहिली. मी मनापासून तिची आभारी आहे" असं फ्लोरा सैनी म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List