माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण? पोलिसांचा तपास सुरू
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत बेपत्ता झाला असून त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ऋषिकेश पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत. स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमलाही यासंदर्भात निनावी फोन आला. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहे.
पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणाहून माजी मंत्र्यांच्या मुलाचं अपहरण होणं, ही गंभीर बाब आहे. स्विफ्ट गाडीतून चारजण उतरले आणि त्यांनी ऋषिकेशचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण कुणी आणि कशासाठी केलं याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांचे एक पथक तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज परिसरातील निवासस्थानी पोहोचलं आहे. त्या निवासस्थानी कुणाचे फोन आले होते का किंवा खंडणी मागण्यात आली होती का याची माहिती पोलिस घेत आहेत. या प्रकरणी ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत. तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी फोन पुण्यातील कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List