अमित शहांकडून तुमचं कधी ऑपरेशन होईल व काय कापलं जाईल ते तुम्हालाही कळणार नाही, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेना टोला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अगदी मोजक्या शब्दात एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. सतत ऑपरेशन केलं अशा बाता मारणाऱ्या एकनाथ शिंदे यांना टोला लगावताना संजय राऊत यांनी त्यांना चांगलेच फटकारले. ”अमित शहांकडून कधी तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येईल, कधी तुमचं ऑपरेशन होईल व तुमचं काय कापलं जाईल हे तुम्हालाही कळणार नाही, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी मिंध्यांना लगावला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. ”महाराष्ट्रातील सरकार ही वेड्यांची जत्रा आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की केजरीवाल खुर्ची साठी लढत होते. मग ते कशासाठी लढत होते? यांना विजयाचा हँगओव्हर झाला आहे, तो उतरत नाही अजून, अहंकार आहे. निदान देवेंद्र फडणवीसांनी संयमाने बोलायला हवं. या राजकारणात जे आलेले आहेत ते सगळे खुर्चीसाठीच लढत असतात. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता ते आम्ही पाहिलंय. आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे तुमचे उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत ते ही आम्ही पाहतोय, असं संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List