Mumbai Local News – चाकरमान्यांची तारांबळ उडणार! पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा जम्बो मेगाब्लॉक, जाणून घ्या कधी सुरू होणार
पश्चिम रेल्वेवर 13 तासांच्या जम्बो ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. ग्रॅन्ट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी अप आणि डाऊन जलद मार्गांवरील वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे. ब्लॉक कालावधीत रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत ट्रॅक दुरुस्ती, सिग्नल यंत्रना अपडेट आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतुक चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच काही ट्रेन्स या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच चर्चगेटपर्यंत धावणाऱ्या काही ट्रेन्स या वांद्रे ते दादरपर्यंत धावतील किंवा रद्द केल्या जातील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List