माणूस अमर होणार…? पहिल्यांदाच माणसाच्या शरीरात मशीनवालं हृदय धडधडलं; कुठे घडला चमत्कार?

Mechanical Heart Transplant : माणसाने ठरवलं तर तो कशावरही मात करू शकतो. कोणतीही गोष्ट आपल्या नियंत्रणात आणू शकतो. चंद्रावर जाणारा माणूस आता मंगळाकडे कूच करतोय. अंतराळातील स्पेस सेंटरमध्ये राहतोय. आता माणूस अमर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मृत्यूवर मात करण्यावर त्याचा भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून शास्त्रज्ञांनी एक प्रयोग यशस्वी केला आहे. पहिल्यांदाच मानवी शरीरात मशीनवालं हृदय धडकलं आहे. मॅकेनिकल हार्ट इम्प्लांट करून एका रुग्ण महिलेला नवीन आयुष्य देण्यात आलं आहे. दिल्लीच्या कँट आर्मी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच Left Ventricular Assist Device (LVAD) इम्प्लांट करण्याचा इतिहास घडला आहे. ही प्रक्रिया (हार्टमेट-3) HeartMate 3 डिव्हाइसचा वापर करून करण्यात आली आहे. हार्ट फेल्यूअरच्या शेवटच्या स्टेजला असलेल्या रुग्णांसाठी हे डिव्हाइस वरदानापेक्षा कमी नसल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
महिला रुग्णामध्ये मॅकेनिकल हार्ट इम्प्लांट
एका 49 वर्षीय महिला रुग्णामध्ये मॅकेनिकल हार्ट इम्प्लांट करण्यात आलं आहे. ही महिला माजी सैनिकाची पत्नी आहे. गेल्या दोन वर्षापासून ती हार्ट ट्रान्स्प्लांटची वाट पहात होती. पण ते होतं नव्हतं. त्यामुळे तिची प्रकृती बिघडत चालली होती. त्यानंतर LVAD म्हणजे ‘मॅकेनिकल हार्ट’ इम्प्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मशीन असलेलं हृदय कसं?
एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार महिलेचं लेफ्ट व्हेंट्रिक्यूलरमधून रक्ताचे पंपिंग जवळपास बंद झालं होतं. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी हार्ट ट्रान्स्प्लांट हाच एकमेव पर्याय होता. हृदयाच्या मदतीने पुन्हा एकदा ब्लड पंपिंगमध्ये सुधारणा करायची होती. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने हा निर्णय घेतला. ते लावल्यानंतर महिलेचं हार्ट ट्रान्स्प्लांट करण्याची गरज राहणार नाही. कारण ते दीर्घकाळ सक्रिय राहील आणि रुग्णाला हेल्दीही ठेवणार आहे.
रुग्णाची प्रकृती कशी?
मॅकेनिकल हार्ट लावल्यानंतर या महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीत या महिलेच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आहे. आर्मी हॉस्पिटल (R&R)च्या हाय क्वॉलिटीवाल्या मेडिकल टीमसाठी ही मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे आता हृदयाशी संबंधित आजारात भविष्यात नवीन पर्याय समोर येऊ शकतात.
यापूर्वीही मॅकेनिकल हार्ट इम्प्लांट?
मॅकेनिकल हार्ट इम्प्लांटची केस भारतात पहिल्यांदाच घडली आहे. जगात या प्रकारचे प्रयोग आधीही झालेले आहेत. अमेरिकेसहीत जगातील अनेक देशात या डिव्हाइसचा आधीही वापर करण्यात आलेला आहे. जगभरात आतापर्यंत 18 हजाराहून अधिक रुग्णांना हे उपकरण लावण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे लोक स्वस्थ आहेत. या लोकांमध्ये ही मशीन चांगलं काम करत आहे.
(Disclaimer : या बातमीतील काही माहिती मीडियाच्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. याबाबतचा कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्याशिवाय कोणतंही पाऊल टाकू नका.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List