मटार आता 1 किंवा 2 दिवस नाही तर वर्षभर राहतील फ्रेश; वापरा ‘ही’ सोपी पद्धत
अनेकांना जेवणात मटारची भाजी खूप आवडते. किंवा कधी इच्छा झाली की, पनीर मटार किंवा पावभाजी, मसालेभात आपण बऱ्याच प्रकरे मटारचा उपयोग करत असतोच. शिवाय हिवाळा म्हटलं की मटारचा सिजन. पण दरवेळी मटार आपल्या फ्रिजमध्ये असतीलच असं नाही. आणि दरवेळी बाजारात जाऊन ते विकत आणणं शक्य नाही. अशात लोकं फ्रोजन मटार विकत घेतात. ज्याला फ्रोजन पीस देखील म्हणतात. पण या फ्रोजन वाटण्यांना चांगली चव येत नाही, त्यामुळे ते खाण्याची मजा जाते. पण आज अशा काही ट्रीक्स जाणून घेणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही मटार चक्क वर्षभर म्हटलं तरी स्टोअर करू शकता तेही अगदी फ्रेश.
ब्लँचिंग करणे हा उत्तम उपाय
मटार पौष्टिक असतातय यामध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी, फायबर, प्रोटीन देखील आढळतं, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण घरच्याघरी साठवून ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते पाहुया. प्रथम हिरवे वाटाणे उकळत्या पाण्यात एक ते दोन मिनिटे ब्लँचिंग करा.ब्लँचिंग म्हणजे भाज्या उकळत्या पाण्यात किंवा थोड्या काळासाठी वाफेवर काढणे. त्यानंतर लगेच बर्फाच्या थंड पाण्यात हे मटार टाका. ही कृती केल्याने मटारचा हिरवा रंग टिकून राहील आणि त्यांचे पोषणमूल्यही जपले जाईल.
थंड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, स्वच्छ किचन टॉवेल किंवा पेपर नॅपकिन वापरून ते वाळवून घ्या. पूर्णपणे वाळल्यानंतर आता हे मटार एअर-टाइट झिप-लॉक कंटेनर, फ्रीझर-सेफ कंटेनर किंवा फ्रीझर बॅगमध्ये साठवले जाऊ शकतात.
आता थोडं सविस्तर पाहू
एका सॉसपॅनमध्ये 3 ते 4 लिटर पाणी उकळवून घ्या. पाणी चांगले उकळू लागले की, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर आणि 1 चिमूटभर बेकिंग सोडा घाला त्यामुळे त्याचा हिरवा रंग टिकून राहतो. पाणी उकळले की, त्यात मटार घाला आणि फक्त 2 मिनिटे उकळवून घ्या. उकळल्यानंतर, त्यांना ताबडतोब बर्फाच्या पाण्यात ठेवा. यामुळे बीन्स शिजवण्याची प्रक्रिया थांबेल आणि त्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडणार नाहीत.
मटार पूर्णपणे वाळवणे ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. त्यामुळे बर्फातील पाण्यातून काढल्यावर वाटाण्यांना स्वच्छ कापडावर ठेवा आणि हवेत वाळवा जेणेकरून ते एकत्र चिकटणार नाहीत आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतरही वेगळे राहतील. या सोप्या पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही वर्षभर ताजे वाटाणे वापरू शकाल आणि तुम्हाला बाजारातून फ्रोजन पॅकेटवर अवलंबून राहावे लागणार नाही.
ही एक सोपी स्टेप वापरून तुम्ही मटार वर्षभर स्टोअर करू शकता. मुख्य म्हणजे हे वाटाणे ताजे राहण्यास मदत होते. तसेच बाजारातून आणलेल्या फ्रोझन वाटाण्यांपेक्षा घरी अशा पद्धतीने बनवलेले वाटाणे कधीही उत्तम आणि पौष्टिक असतात. शिवाय तुम्हाला दरवेळी बाजारातून नव्यानं मटार आणण्याची आवश्यकता भासणार नाही. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही मटाराचा वापर करू शकाल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List