Bigg Boss winner: कुठे आणि कोणत्या स्थितीत आहे ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनचा विजेता? शो जिंकूनही करिअर फ्लॉप
सलमान खान होस्ट करत असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’ 18 चा आज (19 जानेवारी 2025) ग्रँड फिनाले आहे. काहीच वेळात ‘बिग बॉस’ 18 चा विजेता समजणार आहे. 18 व्या सीझनच्या स्पर्धकांबद्दल तसे सर्वजण जाणतात. पण ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनचा विजेत्याबद्दल तुम्हाला माहित आहे का?
‘बिग बॉस सीझन 1’ चा विजेता तरीही स्टारडम नाही
टीव्हीचा लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ 2007 पासून सुरू आहे. पहिल्यांदा हा शो अर्शद वारसीने होस्ट केला होता. या शोचा विजेता ठरला होता राहुल रॉय. राहुल रॉयचा ‘आशिकी’ हा चित्रपट खूप गाजला. लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिले होते. त्यानंतर राहुल रॉयचा कोणताही चित्रपट इतका चांगला गेला नाही. या चित्रपटानंतर 2007 मध्ये तो रिॲलिटी शो बिग बॉस सीझन 1 मध्येही दिसला होता. हा शोही त्याने जिंकला. पण तरीही त्याला स्टारडम मिळालं नाही.
‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनचा विजेता ठरलेला अभिनेता राहुल रॉयने आपल्या व्यक्तिमत्त्व आणि खेळाच्या जोरावर या शोचे विजेतेपद पटकावले. मात्र, हा शो जिंकल्यानंतरही राहुल रॉयला जे स्टारडम मिळायला हवे होते, ते मिळाले नाही. आता मात्र तो कुठे आहे आणि कोणत्या अवस्थेत आहे हे अनेकांना माहित नसेल.
राहुल रॉयने ‘बिग बॉस 1’ जिंकला होता
राहुल रॉय 90 च्या दशकातील महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ या चित्रपटातून त्यांने करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी होते. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘आशिकी’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला आणि त्याची गाणी सुपरहीट झाली. ही गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत.
राहुलने ‘बिग बॉस 1’ नक्कीच जिंकला होता, पण त्यानंतर त्याला चित्रपट आणि टीव्हीच्या चांगल्या ऑफर्स आल्या नाहीत. त्यांचे काही चित्रपट प्रदर्शित झाले, पण ते फार काही चालले नाही. ‘आशिकी’ नंतर त्याचा एकही प्रोजेक्ट मजबूत नव्हता. त्यामुळे नंतर हा अभिनेता कुठे गेला, काय करतोय हे नक्कीच फार कोणाला माहित नाही.
राहुल रॉय सध्या कुठे आहे आणि काय करतो?
राहुल रॉय आता स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवतो आणि अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. आता राहुल बिझनेसमन झाला आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या दिनचर्येबद्दल अपडेट देत असतो. राहुल रॉयला प्रवासाचीही खूप आवड आहे. तो आउटिंगचे फोटोही शेअर करतो. एक काळ होता जेव्हा मुली राहुल रॉयसाठी वेड्या होत्या. पण आता त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तो त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List