सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून तपास सुरु आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “पोलिसांनी या घटनेबाबतची सर्व माहिती दिली आहे. या पाठीमागे कशाप्रकारचा मोटीव असू शकतो, हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आरोपी कुठून आला हे देखील पोलिसांनी सांगितलं आहे. आता पूर्ण कारवाई सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“मला असं वाटतं की देशातील मेगासिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की, कधीकधी काही घटना घडतात. त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य होणार नाही. याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण मुंबई अधिक सुरक्षित राहायला पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “सैफ अली खान यांच्या घरात झालेली घुसखोरी आणि त्यांच्यावर झालेला चाकू हल्ला हे धक्कादायक आहे. त्यांची प्रकृती ठीक आणि बरी आहे. हे ऐकून दिलासा मिळाला आहे आणि कठीण काळ संपवून ते लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावे, अशी आम्ही प्रार्थना करतोय. पण हे घडले, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडवून देतेय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“गेल्या 3 वर्षांत हिट अँड रन प्रकरण, अभिनेते आणि राजकारण्यांना धमक्या देणे, बीड आणि परभणीमधील घटनांसारख्या घटनांवरून हेच ​​दिसून येते की, सरकार गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपल्या सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारा कोणी आहे का?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.

प्रवीण दरेकर यांचंदेखील प्रत्युत्तर

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “सैफ अली खान प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल. परंतु लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखड्यात उतरण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचे भान कदाचित संजय राऊत यांना नसेल. परंतु पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चोराने सैफच्या घरातील ‘या’ व्यक्तीला ओलीस धरलं? मध्यरात्री घरात घडला थरार; नवा खुलासा धक्कादायक चोराने सैफच्या घरातील ‘या’ व्यक्तीला ओलीस धरलं? मध्यरात्री घरात घडला थरार; नवा खुलासा धक्कादायक
मुंबईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात...
सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडन हिचे ट्वीट, म्हणाली, हे तर आता….
‘सैफ यांच्या लहान मुलाकडे जात होता हल्लेखोर तेव्हाच…’, रात्री 2 वाजता घरात काय घडले, पोलिसांना केअरटेकरने सांगितली संपूर्ण घटना
चाकू हल्ल्यात सैफ अली खान याच्या स्पायनल कॉर्डला जखम, अशा दुखापती का असतात धोकायदायक?
Kho Kho World Cup – हिंदुस्थानी महिलांचा मलेशियावर 80 गुणांचा शानदार विजय, रेश्मा राठोड सामन्याची मानकरी
एलॉन मस्क यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Video – सैफवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांनी दिल्या तीन महत्त्वाच्या अपडेट