हर्णे बंदर पर्यटकांनी हाऊसफुल्ल, पापलेट, कोळंबी, सुरमईला मोठी मागणी

हर्णे बंदर पर्यटकांनी हाऊसफुल्ल, पापलेट, कोळंबी, सुरमईला मोठी मागणी

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टच्या दोन दिवस आधीच सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची सकाळी-सकाळी रोजच हर्णे बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये येणारी मासळी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

मिनी महाबळेश्वर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या दापोलीचे थंड आल्हाददायक वातावरण, दापोली शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला केळशी ते दाभोळपर्यंतचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि नारळी-पोफळीच्या बागांची निवांत सावली यामुळे पर्यटकांकडून दापोलीतील समुद्रकिनाऱ्याला मोठीच पसंती मिळत आहे. दापोलीत दाभोळ, बुरोंडी, आडे, केळशी बंदरात मासेमारी होत असली तरी मुख्यत्वे हर्णे हे तालुक्याचे ताजी मासळी मिळण्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळ संध्याकाळ असे दिवसातून दोनदा मासळीचा लिलाव होत असतो. महाराष्ट्रभरातून पर्यटक मासळी खरेदीसाठी हर्णे बंदरात आवर्जून येतात.

दापोलीतील बंदरात ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारीकरिता समुद्रामध्ये जायला लागल्या. त्यात येणाऱ्या मासळीमध्ये जेलीफिशचे प्रमाण जास्त होते तर खाण्यासाठी लागणाऱ्या मच्छीचे प्रमाण खूपच कमी होते. मात्र फिशिंगसाठी दररोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत. त्यामुळे मत्स्यहारी खवय्यांची मासळीची भूक भागत होती.

पर्यटकांची प्रचंड गर्दी, हॉटेल्स फुल्ल

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सन 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तर सन 2025 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने हजर झाले आहेत. दापोलीत पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील किनारपट्टी आणि किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.

मत्स्याहारावर मारला ताव

दापोलीत पर्यटनासाठी येणारे हे पर्यटक खास फिरणे आणि मासळी खाणे आणि खरेदीसाठी येत असतात. येथे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामधील ताजी मासळी खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टमध्ये झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक येथे येत आहेत. पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळीला पर्यटकांची मागणी जास्त आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाना पटोलेंना डच्चू? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती जाणार? घडामोडींना वेग नाना पटोलेंना डच्चू? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती जाणार? घडामोडींना वेग
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. मात्र दुसरीकडे महायुतीला मोठा फटका बसला...
मराठा आरक्षणासाठी नेमलेली शिंदे समिती आता कार्यालया विना, मंत्रालयातील कार्यालय गुंडाळले?
‘त्याने मला ड्रग्ज दिले, कारमध्ये माझ्यावर…’, प्रसिद्ध सेलिब्रिटीवर कंगनाकडून गंभीर आरोप
तारक मेहता… फेम रोशन सिंग सोढीने अन्न, पाणी सोडलं, प्रकृती चिंताजनक
सुंदर अभिनेत्री बनली साध्वी; ‘महाकुंभ’मधील त्या व्हिडीओची चर्चा
लग्नाआधी बाळ, बॉयफ्रेंडने संबंध तोडले,घरच्यांनी मध्यरात्री बाहेर काढलं;तिच बॉलिवूड अभिनेत्री आहे करोडोंची मालकीण
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; गुरुमातेकडून वसुंधरेला शिक्षा