जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पलायन करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पलायन करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

परप्रांतीय कामगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना जालना रेल्वे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी कदीम जालना पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. फैजान खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जालना रेल्वे स्टेशन परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी पीडितेचे वडील वॉचमनची नोकरी करतात. यामुळे पीडितेचे कुटुंब तेथेच राहते. आरोपीही याच इमारतीत फरशी बसवण्याचे काम करत होता. चार दिवसांपूर्वी पीडिता इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळत टाकण्यासाठी गेली असता आरोपीने तिच्यावर बाथरुमध्ये बळजबरीने नेत बलात्कार केला. मात्र बदनामीच्या भीतीने पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.

रविवारी दुपारी पीडिता कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता आरोपीने पुन्हा तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरडा करताच आरोपी पळून गेला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी कदीम जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्कार, विनयभंग तसेच अॅट्रोसिटी कायदा आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरू करत पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीच्या रेल्वे स्टेशन परिसरातून मुसक्या आवळल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानबद्दल काही वेगळं सांगायला नको. शाहरूख खान म्हणजे लाखो नाही तरी करोडो दिल की धडकन आहे....
शरीराच्या ‘या’ भागावर होतो परिणाम… बसल्या बसल्या पाय हलवता? लगेच सोडून द्या सवय
कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेक एकत्र प्यायल्यामुळे काय होते? जाणून घ्या दुष्परिणाम
हिवाळ्यामध्ये आलू बुखारा खाण्याचे जबरदस्त फायदे… ऐकुन व्हाल थक्क
ब्राउन शुगर किंवा मध? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर
नातं टिकवा, नातं मजबूत करा… 2025 मधील महत्त्वाच्या टिप्स काय?
सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या; संतोष देशमुख हत्याप्रकरणावर अंजली दमानिया यांचा टोला