4 चेंडू अन् 4 गडी बाद; अर्जेंटिनाच्या पठ्ठ्याची ऐतिहासिक कामगिरी, घेतली डबल हॅट्रीक
फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारा देश म्हणून अर्जेंटिनाची क्रिडाविश्वात ख्याती आहे. अर्जेंटिना म्हटल की लिओनल मेस्सीचे नाव आपसूक तोंडावर येते. फुटबॉलचा चाहतावर्ग अर्जेंटिनामध्ये मोठ्या संख्येने आहे. परंतु याच फुटबॉलप्रेमी देशातील एका खेळाडूने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये डबल हॅट्रीक घेण्याची किमया साधली आहे.
अर्जेंटिना आणि केमन आयलंड या देशामध्ये टी-20 वर्ल्ड कप पात्रता फेरीतीला सामना पार पाडला. या सामन्यामध्ये अर्जेंटिनाच्या 36 वर्षीय वेगवान गोलंदाज हर्नान फेनेल याने चार चेंडूंमध्ये चार विकेट घेत इतिहास रचला आहे. या सामन्यामध्ये फेनेलने फक्त 14 धावा देत 5 विकेट घेतल्या. परंतु अर्जेटिंनाला हा सामना 22 धावांनी गमवावा लागला. तरीही फेनेलने आपल्या गोलंदाजीची साऱ्या जगाला दखल घ्यायला लावली. तसेच डबल हॅट्रीक घेणारा फेनेल सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी डबल हॅट्रीक घेण्याचा भीमपराक्रम राशिद खान, लसिथ मलिंगा, कर्टिस कॅम्फर, जेसन होल्डर आणि वसीम याकुब या गोलंदाजांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List