ज्यावर कोणताच उपचार नाही, अशा आजाराने घेतला झाकिर हुसैन यांचा जीव, कोणता आहे एवढा धोकादायक आजार?

ज्यावर कोणताच उपचार नाही, अशा आजाराने घेतला झाकिर हुसैन यांचा जीव, कोणता आहे एवढा धोकादायक आजार?

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकिर हुसैन यांचे सोमवारी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांना अशा एका आजाराने ग्रासलं होतं ज्यावर शक्यतो कोणताच उपचार नाहीये. अशाच आजाराने झाकिर हुसैन यांचा जीव घेतल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले.

प्राथमिक अहवालानुसार त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होती. त्यांच्यावर तीन आठवडे उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, झाकिर हुसैन यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. हा आजार असा आहे की, ज्यावर आजपर्यंत कोणताही उपचार नाही. काय आहे हा आजार जाणून घेऊया…

‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’काय आहे आजार?

‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’हा एक फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये फायब्रोसिस अर्थात जखमसदृश डाग निर्माण होतो. त्यामुळे फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात अडचण येते. हळूहळू फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते. मात्र या आजारावर अद्याप कोणताही ठोस असा इलाज डॉक्टरांना आणि संशोधकांना सापडलेला नाही. मात्र, या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि यापासून दूर राहण्यासाठी काही औषधे मात्र दिली जातात.

कुणाला होऊ शकतो हा आजार?

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार प्रामुख्याने 50 वर्षांवरील लोकांना होतो. परिस्थिती हळूहळू बिघडत जाते. सुरवातीला कोरडा खोकला लक्षणात्मक दिसतो. हा आजार जसजसा वाढत जातो तसतसे काम करताना, व्यायाम करताना किंवा चढताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. आयपीएफ रुग्णांना अनेकदा थकवाही जाणवतो. अनेकवेळा नखे जाड दिसू लागतात, ज्याला नेल क्लबिंग असही म्हणतात.

या आजाराची लक्षणे काय असतात?

1) सतत कोरडा खोकला येणे, जो उपचारानंतरही बरा होताना दिसत नाही.

2) सामान्य कामे करतानाही थकवा जाणवणे

3) काही रुग्णांना छातीत जास्त धडधडणे किंवा भिती वाटल्यासारखे जाणवणे

4) कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे

5) शारीरिक हालचाली करताना श्वास लागणे

6) रात्री ताप आणि घाम येणे

आजार होण्याची मुख्य कारणे काय असू शकतात?

1) धूम्रपान

2) अनुवंशिकता म्हणजे कुटुंबात जर कोणाला असेल तर

3) ऑटो इम्यून डिसीज

4) व्हायरल इन्फेक्शन

5) 60 ते 70 वर्षांच्या वयात हा धोका जास्त असतो

आजारापासून कसा बचाव करू शकतो?

1) वर्षभरात एकदा फ्लू आणि न्यूमोनियाची लस घेणे

2) दररोज व्यायाम करा.

3) धूम्रपान न करणे

4) निरोगी आणि संतुलित आहार घेणे

दरम्यान या आजारावर अद्यापतरी कोणताही ठोस उपाय सापडलेला नसल्याने औषधांची मात्राही फारशी लागू होताना दिसत नाही. त्यामुळे याबाबत योग्य ती काळजी घेतलेली बरी.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कधी? विखे पाटलांचं मोठं वक्तव्य धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कधी? विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं...
दोन अफेअर,10 वर्ष रिलेशनशिप; तरीही 53 वर्षीय तब्बू सिंगलच का राहिली? कारण विचारताच अभिनेत्रीनं घेतलं तिसऱ्याचं अभिनेत्याचं नाव
सतत चिडचिड होतेय, रडू येतय, मूड नाहीये? ‘हे’पदार्थ नक्की खा, लगेचच व्हाल एकदम फ्रेश
मराठीचा आग्रह धरला म्हणून तरुणाला मागावी लागली माफी, मुंब्र्यातली धक्कादायक घटना
खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना सरकारने काढावी, अंबादास दानवेंची मागणी
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा, वयवाढ न केल्याने लाखो विद्यार्थी अपात्र
Tata Mumbai Marathon 2025 – इथिओपियाच्या हेले लेमी बेरहानूला इतिहास रचण्याची संधी, ‘या’ दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात