पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असतानाही… मंत्रीमंडळातून वगळल्यानंतर सुधीर मुनगंटीवाराची पहिली प्रतिक्रीया
भाजपने मित्र पक्षाच्या साथीने रविवारी नव्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. या मंत्रीमंडळात काही नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली मात्र अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज नागपूरात असूनही हिवाळीच्या अधिनवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनुपस्थित राहिले. त्यामुळे मुनगंटीवारही नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मंत्रीपदाविषयी विचारल्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मला मंत्रीपद देणार नाही यबाबत मला काहीच सांगितले नव्हते. मला मंत्रीपद देणार आहेत असेच सांगण्यात आले होते. मला कधीच सांगितले नव्हते की मला मंत्रीपदावर घेणार नाही. त्यामुळे आता नवीन जबाबदारीची वाट पाहावी लागणार. मला मंत्रीपद का दिले नाही याचे उत्तर ज्यांनी मला फोन नाही केला त्यांनांच विचारावे लागेल. मी कालपासून त्याच विचारात आहे की मंत्रीपद न देण्याचे नेमके काय कारण आहे. तेवढं समजलं तर मलाही दुरुस्ती करता येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.
पावलापावलावर मनाविरुद्ध घडत असतानाही…
मंत्रीमंडळात तुम्हाला संधी न देणं हे संघटनेचा निर्णय होता की कुणा एका व्यक्तीचा याबाबत विचारल्यावर मुनगंटीवार यांनी त्यांना प्रमोद महाजनांनी सांगितलेले एक वाक्य ऐकवले. ”मी फक्त संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस, कार्यकर्ता आहे आणि मला स्वर्गीय प्रमोद महाजनांचे वाक्य खूप आवडायचे की पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असतानाही जो काम पुढे नेतो तोच खरा कार्यकर्ता ते वाक्य मी आयुष्यभर जपून ठेवले आहे”, असे मुनगंटीवार म्हणाले
फडणवीस आणि बावनकुळे यांनी नाव पाठवले असेच सांगितले
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझे बोलणे व्हायचे. त्यांनी कधी असे जाणवू दिले नाही की मला मंत्रीपद देणार नाही. त्यांनी कायम नाव पाठवले असल्याचेच सांगितले, असे मुनगंटीवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List