मतदानासाठी सायंकाळी 6 वाजता रांगेत उभे राहिलेल्यांना किती टोकन दिले? निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती उघड करण्यास दिला नकार

मतदानासाठी सायंकाळी 6 वाजता रांगेत उभे राहिलेल्यांना किती टोकन दिले? निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती उघड करण्यास दिला नकार

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी सायंकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या सर्व लोकांना किती टोकन वितरित केले गेले, याची बुथनिहाय माहिती वंचित बहुजन आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र संबंधित माहिती दैनंदिन पाकिटात बंद करून सुरक्षा जमा केली आहे. त्यामुळे ती देणे शक्य नाही, असे स्पष्ट करीत निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. मतदानासाठी सायंकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या सर्व लोकांना किती टोकन वितरित केले गेले? यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न पत्रातून विचारण्यात आले होते. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती उघड करण्यास नकार दिला. त्यावर वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर ‘पोकळ उत्तर’ म्हणावे लागेल, असे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आम्ही कुठे म्हणालो की तुम्ही खुनाचे आरोपी, खूनाचे आरोपी हे…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ? ‘आम्ही कुठे म्हणालो की तुम्ही खुनाचे आरोपी, खूनाचे आरोपी हे…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे निर्घृण खून झाल्यानंतर २२ दिवसांनंतर वाल्मिक कराड हे स्वत: हून पोलिसांना शरण आले...
मोठी बातमी! ‘तीन महिन्यांत राज्यातलं सरकार कोसळणार’; शरद पवारांच्या जवळच्या माणसाचा खळबळजनक दावा
कॅन्सर शरिरात पसरला,जगण्याची शक्यता फक्त 30 टक्के… सोनाली बेंद्रेचा अंगावर शहारा आणणारा अनुभव
टी बॅग सौंदर्यासाठी फायदेशीर, ‘या’ टिप्स फॉलो करा
तर त्या लाडक्या बहीणींचे पैसे होणार बंद, मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती
Photo – सिडनी कसोटीपूर्वी दोन्ही संघांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत ग्रेट भेट
राज्यात 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुजा खेडकरमुळे चर्चेत आलेले दिवसे यांना बढती