“सगळे प्रयत्न करून थकलो..”; आई होण्याविषयी अभिनेत्रीने मारली हार
'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाने 2004 मध्ये हरमीत सिंहशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 2009 मध्ये शेफाली आणि हरमीत विभक्त झाले. त्यानंतर 2014 मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं.
शेफाली जरीवालाने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, वयाच्या 12 व्या वर्षापासूनच ती बाळ दत्तक घेण्याविषयी विचार करत होती. "मी आणि पराग बऱ्याच काळापासून बाळ दत्तक घेण्याचा विचार करत होतो. मात्र तेही शक्य होत नव्हतं. त्यात कायदेशीर अडचणी बऱ्याच येत होत्या", असं ती म्हणाली.
माझ्या आणि परागच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे मी आई होऊ शकली नाही. गर्भधारणेत मला बऱ्याच समस्या आल्या. आम्ही दोघांनी बाळासाठी सर्व प्रयत्न केले. आता असं वाटतं जे आमच्या नशिबात असेल ते होईल", असं ती पुढे म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List