मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; प्रचंड खड्डे, झेब्रा कॉसिंग, साईडपट्ट्या, दिशादर्शक फलकांचा अभाव

मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा;  प्रचंड खड्डे, झेब्रा कॉसिंग, साईडपट्ट्या, दिशादर्शक फलकांचा अभाव

>>  महेंद्र पवार / सुरेश वळवी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. घोडबंदर ते अच्छाडदरम्यान अपघातांचे सर्वात डेंजर झोन आहेत. प्रचंड खड्डे, निकृष्ट कामामुळे रस्त्यावर तयार झालेले उंच सखल भाग, झेब्रा क्रॉसिंग नसणे, साईडपट्ट्या, दिशादर्शक फलकांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने तयार केलेली बाह्य वळणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तलासरी – अच्छाडपर्यंतच्या महामार्गावर अपूर्ण ठेवलेले सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण करण्यात शासन लक्ष देत नसल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

महामार्गावर सुखकारक प्रवास व्हावा यासाठी वाहनचालक मोठ्या प्रमाणात टोल भरत आहेत. टोल भरूनसुद्धा वाहनचालकांना अपूर्ण कामांचा आणि खड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करताना ठिकठिकाणी अपूर्ण काम ठेवून चढ-उतार (पॅच/रॅम्प) सोडण्यात आले आहेत. या ठिकाणी सूचना आणि दिशा दर्शक फलक, लाईटची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे भरधाव वाहनचालकांना रस्ता दिसत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

मनोर गेट, नांदगाव मनोर, एशियन पंप, आंबोली येथे उड्डाणपूल नसल्याने तर चारोटी ते महालक्ष्मी, दुर्वेश ते हलोली, चिंचपाडा येथील सेवा रस्ता अपूर्ण असल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याची माहिती पालघर जिल्हा ऑल इंडिया वाहनमालक संघटनेचे अध्यक्ष हरबन्स नन्नाडे यांनी दिली.

या ठिकाणी मृत्यूचा दबा

आमगाव उड्डाणपूल, सावरोली उड्डाणपूल, तलासरी नाका उड्डाणपूल, ठक्करबाप्पा पूल, वडवली वारोली नदी पूल, दापचरी ठाकरपाडा उड्डाणपूल, आरटीओ चेक पोस्ट, दापचरी गेट, धुंदलवाडी उड्डाणपूल, मनोर गेट, मेंढवण, सोमटा, चिंचपाडा, चारोटी उड्डाणपूल, एशियन पंप, महालक्ष्मी मंदिर चढाव, आंबोली येथील अनधिकृत कट, अच्छाड या ठिकाणी मृत्यू दाब धरून बसलेला असतो. वाहनचालकाची छोटीशी चूकही गंभीर अपघाताला आमंत्रण देते.

निकृष्ट कामामुळे कार दहा फूट उडाली

तलासरी हद्दीत पाडवीपाडा येथे एका हॉटेलसमोर मुंबई वाहिनीवर अर्धवट काम आहे. झालेले कामही निकृष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी भीषण अपघात झाला. उंच सखल रस्त्यामुळे एक कार दहा फूट हवेत उडाली. हा अपघात सीसी कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सर्वत्र व्हायरल होत आहे. अपघाताला एनएचआय आणि ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश प्राधिकरण अधिकारी सुमित कुमार यांनी ठेकेदाराला दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानबद्दल काही वेगळं सांगायला नको. शाहरूख खान म्हणजे लाखो नाही तरी करोडो दिल की धडकन आहे....
शरीराच्या ‘या’ भागावर होतो परिणाम… बसल्या बसल्या पाय हलवता? लगेच सोडून द्या सवय
कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेक एकत्र प्यायल्यामुळे काय होते? जाणून घ्या दुष्परिणाम
हिवाळ्यामध्ये आलू बुखारा खाण्याचे जबरदस्त फायदे… ऐकुन व्हाल थक्क
ब्राउन शुगर किंवा मध? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर
नातं टिकवा, नातं मजबूत करा… 2025 मधील महत्त्वाच्या टिप्स काय?
सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या; संतोष देशमुख हत्याप्रकरणावर अंजली दमानिया यांचा टोला