कमरेला झेंडा गुंडाळण्यापासून ते ‘गंदी बात’पर्यंतचा प्रवास; कोण आहे गहना वशिष्ठ?

कमरेला झेंडा गुंडाळण्यापासून ते ‘गंदी बात’पर्यंतचा प्रवास; कोण आहे गहना वशिष्ठ?

पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव आले आहे. या प्रकरणी तिची ईडीने सात तास चौकशी केली आहे. या चौकशीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्राच्या घर आणि कार्यालयावर ईडीने याच प्रकरणात छापेमारी केली आहे. त्यामुळे गहनाही चर्चेत आली आहे. त्यामुळे गहनाचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोण आहे गहना वशिष्ठ? ती अचानक चर्चेत का आली?

शॉकिंग खुलासे

पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री, निर्माती गहना वशिष्ठचे नाव समोर आले आहे. गहनाची ईडीने या प्रकरणात कसून चौकशी केली. यावेळी तिने पोर्नोग्राफी प्रकरणी प्रत्येक चित्रपटासाठी तीन लाख रुपये मिळत होते आणि ती राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये देखील गेली होती, असा दावा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वाद आणि गहना

गहना वशिष्ठ आणि वाद नवीन नाही. गहनाला एकदा एडल्ट व्हिडीओ शूट करून अपलोड करण्याच्या आरोपात अटक झाली होती. ती नेहमीच चर्चेत असते आणि अनेकदा तिला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत.

‘मिस आशिया बिकिनी’ पुरस्कार

गहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. ती छत्तीसगडच्या चिमरी गावाची आहे. लहानपणापासून तिला अभिनय आणि मॉडेलिंगचे प्रचंड आकर्षण होते. तिने 2012 मध्ये ‘मिस आशिया बिकिनी’ पुरस्कार जिंकला होता. गहना हिंदी आणि तेलुगू चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे.

फोटोशूट आणि वाद

गहनाने 2020 मध्ये एक फोटोशूट केले होते. त्यात तिने कमरच्या खाली तिरंगा लपेटला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मोठा वाद निर्माण झाला होता. गहना केवळ पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप यावेळी झाला. या फोटोशूटमुळे मुंबईत तिच्यावर हल्ला झाला होता.

आजाराशी झुंज

2019 मध्ये गहना वशिष्ठ शूटिंगच्या दरम्यान गंभीरपणे आजारी पडली होती. अनेक तास काही न खातापिता काम केल्याने सेटवरच ती भोवळ आली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

करिअर काय?

गहना वशिष्ठ ऑल्ट बालाजीच्या ‘गंदी बात’ वेब सीरिजमध्ये दिसली होती. तसेच तिने स्टार प्लसच्या ‘बहनें’ या प्रसिद्ध मालिकेतही भूमिका केली होती. गहना साउथच्या चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे आणि 2015 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये योगराज सिंग आणि अतुल वासन सोबत एक शो होस्ट केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EWS Certificate : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ EWS Certificate : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. राज्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC (मराठा) कोट्या अंतर्गत...
New Year Celebration : 31 ला पार्टी करताना टल्ली होण्याचा प्लान ? पण 4 पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही..
कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का? विचारणाऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारचं सडेतोड उत्तर
‘देशाने एक महान नेता गमावलाय..’; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
पनवेल फार्महाऊसपासून गॅलेक्सी अपार्टमेंटपर्यंत.. सलमानकडे तब्बल एवढी संपत्ती; आकडा ऐकून डोळे विस्फारतील!
जतमध्ये श्री यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात, महाराष्ट्रासह परराज्यांतील भाविकांची गर्दी
चासनळीत साकारतेय देशातील पहिली ‘श्रीरामसृष्टी, पहिल्या देखाव्याचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण