वडील जर्मन आणि आई बंगाली, तर स्वतःच्या नावापुढे मुस्लिम आडनाव का लावते दिया मिर्झा?
Dia Mirza Birthday Special: अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही वर्षांपासून सिनेमांमध्ये दिसत नाही. पण दिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठ सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. वयाच्या 40 व्या वर्षी देखील तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनोत्री आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. पण दिया फक्त तिच्या सौंदर्यामुळेच नाही खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
दिया मिर्झा हिने तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. दरम्यान आई बंगाली आणि वडील जर्मन असताना अभिनेत्री स्वतःच्या नावापुढे मुस्लिम आडनाव का लावते. असा प्रश्न देखील अनेकदा अभिनेत्रीला विचारण्यात आला.
दिया मिर्झाचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन ख्रिश्चन आणि आई बंगाली आहे. पण दिया फक्त 4 वर्षांची असताना अभिनेत्रीच्या वडिलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या आईने हैदराबादमध्ये राहणाऱ्या अहमद मिर्झासोबत दुसरं लग्न केलं होतं.
अहमद मिर्झाने दिया आणि तिच्या आईला मनापासून स्वीकारलं होतं. सावत्र वडील आणि दिया यांच्यामध्ये फार चांगलं नातं आहे. त्यामुळे अभिनेत्रीने स्वतःच्या नावापुढे मिर्झा हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. आज चाहते तिला अभिनेत्री दिया मिर्झा या नावाने ओळखतात.
दिया मिर्झा हिचे दोन लग्न
दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये बिझनेस पार्टनर साहिल संगासोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अभिनेत्रीने 2021 मध्ये वैभव रेखीसोबत दुसरं लग्न केलं. मोठ्या थाटत अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं.
दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री गोंडस मुलाला जन्म दिला. सांगायचं झालं तर, दिया हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी वैभव यांचं पहिलं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगी देखील आहे. दिया सावत्र मुलीसोबत देखील सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List