आणखी एका घटस्फोटाने बॉलिवूड हादरलं, एआर रहमानचा होणार घटस्फोट

आणखी एका घटस्फोटाने बॉलिवूड हादरलं, एआर रहमानचा होणार घटस्फोट

संगीतकार आणि ऑस्कर विजेता एआर रहमान पत्नीपासून घटस्फोट घेणार आहे. 29 वर्षांच्या लग्नानंतर एआर रहमान आणि सायरा बानो यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एआर रहमान आणि सायरा यांचे 1995 मध्ये लग्न झाले होते. त्यांना खदिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुले आहेत. ए आर रहमान यांच्या पत्नी सायरा बानो यांच्या वकिलाने एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यामुळे सायराने पतीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. सायराने लोकांना तिच्या गोपनीयतेत ढवळाढवळ न करण्याचे आवाहनही केले आहे.

सायरा बानोचे वकील म्हणाले की, ‘लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायराने पती एआर रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यात तणावानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ‘एकमेकांवर प्रेम असूनही, या जोडप्याला त्यांच्या नात्या तणाव आणि अडचणी जाणवत होत्या. त्यांच्या नात्यात एक दरी निर्माण झाली आहे. जी यावेळी कोणालाही भरुन काढणे शक्य वाटत नाही.’

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सायरा बानू यांनी जोर दिला की, वेदना आणि त्रासामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. ती या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयता आणि समजून घेण्याची विनंती करते, कारण ती तिच्या आयुष्यातील या कठीण टप्प्यातून जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)


एआर रहमान आणि सायरा बानो यांचा मुलगा एआर अमीन यानेही इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे. त्याने देखील लोकांना त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेण्याची विनंती केली आहे. पोस्टमध्ये अमीनने लिहिले- ‘यावेळी आम्ही प्रत्येकाला आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन करतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात नक्की खा या 5 भाज्या cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात नक्की खा या 5 भाज्या
कोलेस्टेरॉल शरीरासाठी आवश्यक असते. परंतु त्याचे अतिरेक अत्यंत हानिकारक ठरु शकते. जेव्हा कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा ते रक्तवाहिन्या बंद करतात...
इराण एका दिवसात अण्वस्त्र बनवू शकतो -अयातुल्लाह खोमेनी
आधी लीड रोल, नंतर आयकॉनिक आई, आज कुठे आहे ही अभिनेत्री कुणास ठाऊक?
आणखी एका घटस्फोटाने बॉलिवूड हादरलं, एआर रहमानचा होणार घटस्फोट
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलबाबत मोठा खुलासा, अमेरिकेत घेतले होते ताब्यात
आम्ही 24 तासात अण्विक क्षमता विकसित करू शकतो; रशियाच्या इशाऱ्यानंतर इराणची धक्कादायक आण्विक घोषणा
विरार कॅश कांड प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? सगळं सांगितलं!