रिया सेनच्या वडिलांचं निधन; ॲम्ब्युलन्स घरापर्यंत पोहोचण्याआधीच घेतला अखेरचा श्वास

रिया सेनच्या वडिलांचं निधन; ॲम्ब्युलन्स घरापर्यंत पोहोचण्याआधीच घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री मुनमुन सेन यांचा पती भारत देव वर्मा यांचं मंगळवारी (19 नोव्हेंबर) निधन झालं. कोलकातामध्ये सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार भारत देव यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलावली होती. मात्र ॲम्ब्युलन्स त्यांच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी त्यांनी आपले प्राण सोडले. भारत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. त्यांची आई ईला देवी या कूच बेहारच्या राजकुमारी होत्या. तर मोठी बहीण गायत्री देवी या जयपूरच्या महाराणी होत्या. भारत यांची आजी इंदिरा या वडोदराचे महाराज सर्जीराव गायकवाड तिसरे यांच्या एकुलत्या कन्या होत्या. भारत यांनी अभिनेत्री मुनमुन सेन यांच्याशी लग्न केलं. त्यांना रायमा आणि रिया या दोघी मुलगी असून दोघीही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.

भारत देव वर्मा यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी लिहिलं, ‘मुनमुन सेन यांचे पती आणि माझे हितचिंतक भारत देव वर्मा यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अत्यंत प्रेमळ होते. मी त्यांच्या आठवणी कायम माझ्या मनात जपून ठेवीन. त्यांनी खरोखरच मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानलं होतं. त्यांच्या निधनाने मी खूप काही गमावलंय. आज सकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच मी त्यांच्या बालीगंगे इथल्या निवासस्थानी गेले. तिथे त्यांची मुलगी रिया उपस्थित होती. तर पत्नी मुनमुन आणि दुसरी मुलगी रायमा दिल्लीहून येत आहेत. त्यांनी मी श्रद्धांजली अर्पित करते आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते.’

मुनमुन सेन यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. 1984 मध्ये ‘अंदर बाहर’ टा चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी विविध भाषांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यात ‘100 डेज’, ‘सिरीवेन्नेला’ यांचा समावेश आहे. मुनमुन सेन यांनी त्यांच्या करिअरमध्ये 60 हून अधिक चित्रपट आणि 40 हून अधिक टेलिव्हिजन शोजमध्ये काम केलंय. भारत देव आणि मुनमुन यांची मुलगी रिया सेनने हिंदी, बंगाली, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘विशकन्या’मध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तर ‘स्टाइल’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. रियाने ‘झंकार बीट्स’, ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानापूर्वी पैसे वाटपाचा आरोप, संभाजीनगर, नालासोपारात तुफान राडा मतदानापूर्वी पैसे वाटपाचा आरोप, संभाजीनगर, नालासोपारात तुफान राडा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा आरोप सुरु झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना...
नेत्यांच्या भाषणांमधील नको ते शब्द, हातवारे यांचा अर्थ मुलं विचारतात…, प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चेत
“विवाहित पुरुषाला डेट करण्याचा पश्चात्ताप..”; विक्रम भट्टसोबतच्या अफेअरवर सुष्मिता काय म्हणाली?
रिया सेनच्या वडिलांचं निधन; ॲम्ब्युलन्स घरापर्यंत पोहोचण्याआधीच घेतला अखेरचा श्वास
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा आवळ्याचा मुरब्बा, जाणून घ्या रेसिपी
पोळी की भात? जाणून घ्या रात्रीच्या जेवणासाठी काय खाणे फायदेशीर
भाजपचा खेळ खल्लास! विनोद तावडेंच्या पैसे वाटपावरून संजय राऊत यांचा निशाणा