हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा आवळ्याचा मुरब्बा, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा आवळ्याचा मुरब्बा, जाणून घ्या रेसिपी

थंडी पडायला आता सुरुवात झाली आहे. या दिवसात वातावरण थोडे थंड देखील वाटू लागले आहे. अशा स्थितीत बदलत्या हवामानासोबत रोगप्रतिकारक शक्ती ही बदलते. ज्यामुळे अनेक आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत थंड हंगामात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रोगांपासून संरक्षण होईल.

आवळा हे एक सुपर फूड आहे. जे हिवाळ्यात खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. सहसा आवळ्याचे लोणचे किंवा मुरब्बा बनवल्या जातो. जाणून घेऊया आवळ्याच्या मुरब्ब्याची रेसिपी.

साहित्य

आवळा १ किलो
साखर दीड किलो
पाणी आवळा उकळण्यासाठी
वेलची पावडर एक चमचा
लवंगा ५ ते ६
केसर

कृती

सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुऊन घ्या आणि काट्याच्या मदतीने त्याच्याभोवती छिद्रे करा. हे आवळ्यामध्ये साखरेचा पाक जाण्यास मदत करेल.

आता आवळा उकळण्यासाठी पाण्याचे मोठे भांडे गरम करा. नंतर आवळे त्यामध्ये टाका आणि सुमारे दहा ते बारा मिनिटे ते मऊ होईपर्यंत उकळू द्या. उकळल्या नंतर ते गाळून बाजूला ठेवा.

आता पाक बनवण्यासाठी वेगळ्या पॅनमध्ये साखर आणि चार ते पाच कप पाणी घाला. हे मिश्रण गरम करा आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर तुमचा पाक तयार आहे.

यानंतर उकडलेले आवळे पाकामध्ये टाका आणि ते मंद आचेवर शिजू द्या.

मधून मधून ढवळत असताना आवळ्याला सुमारे 30 ते 40 मिनिटे पाकामध्ये शिजू द्या. साखर शोषतांना हा पाक घट्ट आणि आवळा पारदर्शक झाला पाहिजे हे लक्षात असू द्या.

चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात वेलची पावडर आणि लवंग घालू शकता. गडद रंग आणि सुगंधासाठी तुम्ही त्यात केशर देखील घालू शकता.

अगदी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आवळ्याचा मुरब्बा तयार आहे तुम्ही पराठा किंवा पुरी सोबत मुरब्ब्याचा आनंद घेऊ शकता. आहारात आवळ्याचा अनेक प्रकारे समावेश करू शकता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात तुफान राडा, काय कारवाई होणार? निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात तुफान राडा, काय कारवाई होणार? निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया
भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आला...
Vinod Tawade : विनोद तावडे यांचा गेम? 5 कोटी घेऊन आल्याची भाजपमधूनच टीप, हितेंद्र ठाकुरांचा गौप्यस्फोट
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआनं नोटाचे बंडलच दाखवले, exclusive Photos
निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला
पैशांचं बंडल सापडल्यानंतर ठाकूर पिता-पुत्र आणि तावडेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली, आता पुढे काय?
धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा टिझर प्रदर्शित
लग्नानंतर माधुरीने का सोडली इंडस्ट्री? 25 वर्षांनंतर पश्चात्ताप? म्हणाली “माझी मुलं..”