वोट जिहाद महाविकास आघाडीला भारी पडणार? नोमानींची माशी शिंकली; शेवटच्या क्षणी गेम पालटणार?

वोट जिहाद महाविकास आघाडीला भारी पडणार? नोमानींची माशी शिंकली; शेवटच्या क्षणी गेम पालटणार?

लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीतही वोट जिहादचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल असं चित्र होतं. सत्ताधारी आणि विरोधक विकासाच्या मुद्द्यावरून आमनेसामने येतील असंही दिसत होतं. पण निवडणूक प्रचाराच्या तोफा थंड होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच वोट जिहादच्या मुद्द्याने चांगलाच जोर धरला आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड के प्रवक्ता सज्जाद नोमानी यांची निवडणुकीच्या राजकारणात एन्ट्री झाली. त्यांनी महाविकास आघाडीकडे 17 मागण्या केल्या. मुस्लिमांना महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन केलं आणि तिथेच माशी शिंकली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्या एक्सपोज केल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचा वोट जिहादचा चेहरा उघडा झाला आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीला या निवडणुकीत फटका बसणार असल्याची चिन्हे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा वोट जिहाद उघड केला आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड के प्रवक्ता सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला 17 मागण्या दिल्या होत्या. या सर्व मागण्या मुस्लिम धार्जिण्या आणि हिंदू विरोधी होत्या. त्या महाविकास आघाडीने मंजूरही केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधून नोमानी हे आघाडीला मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. फडणवीस यांनी हा व्हिडीओही बाहेर काढला आणि राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. महाविकास आघाडी ठरवून विशिष्ट समाजाचं लांगूलचालन करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

काय आहेत मागण्या?

मुस्लिम समाजाला 10 टक्के आरक्षण द्या, 2012 ते 2024 दरम्यान राज्यात जेवढ्या दंगली झाल्या. त्यातील मुस्लिमांविरोधातील खटले काढून घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, आदी 17 मागण्या मुस्लिम उलेमांनी महाविकास आघाडीकडे अधिकृत पत्र देऊन केल्या आहेत. महाविकास आघाडीनेही अधिकृत पत्र देऊन या मागण्या मान्य केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यांना जर वोट जिहाद करायचं असेल, धर्माचं युद्ध करायचं असेल तर आपणही जागे झालं पाहिजे. आपण झोपता कामा नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सोमय्या यांची तक्रार

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नोमानी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. वोट जिहाद, मुस्लिम धर्मियांच्या भावना भडकावणे, द्वेषयुक्त भाषणे, ज्या मुस्लिमांनी भाजपचं समर्थन केलं, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालणे आदी आवाहने नोमानी यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

महाविकास आघाडीला फटका बसणार

महाविकास आघाडीची प्रतिमा ही धर्मनिरपेक्ष आणि समतावादी अशी आहे. पण वोट जिहादचा मुद्दासमोर आल्याने महाविकास आघाडीची प्रतिमा डागाळली गेली आहे. विशिष्ट धर्माचं लांगूचालन होत असल्याचं भाजपने उघड केलं आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या आधी हिंदू मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. सज्जाद नोमानी यांचा कारनामा उघड झाल्यानंतर हिंदू मतदार महायुतीच्या मागे जाण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. मुस्लिम बहुल परिसरात महाविकास आघाडीला फायदा होईल. पण हिंदू बहुसंख्य असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत.

राज्यात मुस्लिमांचा प्रभाव असणारी मतदारसंघ अत्यंत कमी आहेत. तुलनेने हिंदू मतांचा प्रभाव असणारे मतदारसंघ अधिक आहेत. अशा ठिकाणी हिंदू मते एकवटून भाजपच्या मागे जाताना दिसत आहेत. त्यातच लाडकी बहीण योजनेचा प्रभावही राज्यात आहे. या सर्वांचा परिपाक पाहता, राज्यात पुन्हा एकदा महायुतीला कौल जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा हिंदुत्ववादी नेते अशी होती. पण नोमानी यांचं प्रकरण उघड झाल्याने ठाकरेंचा हिंदू वोटर त्यांच्या पासून दुरावू शकतो. त्याचा फटका उद्धव ठाकरे यांना मुंबई, संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि ठाण्यात सर्वाधिक बसू शकतो असं जाणकारांचं मत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्धवट सोडून मुंबईला रवाना मोठी बातमी! अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्धवट सोडून मुंबईला रवाना
अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले...
वोट जिहाद महाविकास आघाडीला भारी पडणार? नोमानींची माशी शिंकली; शेवटच्या क्षणी गेम पालटणार?
Nitin Gadkari : ‘बटेंगे तो कटेंगे’ वर आता नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य, अशी केली फटकेबाजी, ठाकरे आणि मी शत्रू नसल्याचा केला दावा
Sharad Pawar : महाविकास आघाडी जिंकली तर सुप्रिया सुळे होणार CM? शरद पवारांनी थेट विषयच संपवला
श्वेताची मुलगी पलक तिवारी या अभिनेत्याच्या मुलाला करतेय डेट, मालदीवमध्ये एकत्र?
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगस्फोट, दुसरा बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश
सब बाटने के बाद भी नहीं जम रहा हैं, म्हणून आता ते ‘बटेंगे तो कटेंगे’ वर आले आहेत; जयंत पाटील यांचा हल्लाबोल