प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं होतं ‘वन नाईट स्टँड’; न बोलवताच पार्टीत पोहोचली दारू पेऊन बेशुद्ध, नशेतच दिला लग्नाला होकार
अभिनेत्री महीप कपूरने 1997 साली संजय कपूरसोबत लग्न केलं. त्यांना आता दोन मुलं आहेत. शनाया कपूर आणि जहान कपूर अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. अभिनेत्री महीप कपूरचा मोठा फॅन फॉलोइंग आहे.ओटीटी प्लॅटफॉम असलेल्या नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’या मालिकेच्या मागील तीन सीझनमुळे तिला चांगली लोकप्रियता देखील मिळाली आहे.संजय कपूरसोबतची तीची केमिस्ट्री आजही तिच्या चाहात्यांना आवडते. ती जेव्हा कॉमेडियन रोनक रजानीच्या शोमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा तीने संजय कपूर आणि आपल्या पहिल्या भेटीबाबत मोठा खुलासा केला.
अभिनेत्री महीप कपूरने संजय कपूर आणि तिच्या लव्ह स्टोरीबाबत बोलताना म्हटलं की, आमची लव्ह स्टोरी सिंपल होती. एका व्यक्तीसोबत माझं वन-नाईट स्टँड झालं. मी कधीही विचार केला नव्हता की मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे म्हणून, मी एक दिवस न बोलवता त्याच्या पार्टीत पोहोचले. त्या पार्टीमध्ये मी त्याला भेटले. मी ड्रीक केलं होतं. दारूच्या नशेत बेशुद्ध झाले.तीथे त्याचं कुटुंब म्हणजेच माझे सासू -सारे देखील मला भेटले होते. मी त्या पार्टीमध्ये खूप दारू प्याले होते.
पुढे बोलताना तीने म्हटलं की मी दारूच्या नशेतच संजय कपूरला लग्नासाठी होकार दिला होता. मी पूर्णपणे दारूच्या नशेत होते. मात्र अशाही अवस्थेमध्ये असताना माझ्या होणाऱ्या सासू- सासऱ्यांनी माझा स्वीकार केला. आमच्यामध्ये काहीच प्रपोजल नव्हतं. त्याने मला फक्त विचारलं की आपल्याला लग्न करायचं आहे, आणि मी पण होकार दिला.
अभिनेत्यानं केली फसवणूक
दरम्यान एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार माहीप कपूर लग्नापूर्वी सुमारे पाच वर्षांपासून संजय कपूरला डेट करत होती. आज त्यांच्या लग्नाला तीस वर्ष झाली. यादरम्यान त्यांच्या संसारात अनेक चढउतार आले. ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये बोलताना तीने आपल्या नात्याबाबत मोठा खुलासा केला होता. तीने म्हटलं की,मला तेव्हा संजयनं फसवलं होतं, धोका दिला होता मात्र मी तेव्हा एका वेगळ्या दृष्टीकोणातून विचार केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List