महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना लाडकी बहीण योजना आणि लाडकी भाऊ योजना जाहीर केली. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आणि लाडक्या भावांना इंटर्नशिपच्या माध्यमातून 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. आता याच दोन योजनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडूनही आज आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यास सर्व बेरोजगार महिलांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यास सरकार सर्व बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांची आर्थिक मदत करेल, अंस आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“आपण जे करतो ते खुलेआम. काळोखात काही करत नाही. आम्ही दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. जे करतो तेच करतो. जे बोलत नाही ते करत नाही. आपण मुलांना कौशल्य विकास देणार. मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहे. रोजगार मिळेपर्यंत काय करायचं हे पंचसूत्रीत आहे. प्रत्येक बेरोजगार तरुणाला… बेरोजगारीची व्याख्या ठरवावी लागणार आहे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांची मदत करणार आहे”, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

‘बेरोजगार आपलं भविष्य’

“युवकांना का नाही आर्थिक मदत करायची? बेरोजगार आपलं भविष्य आहे. यांच्यामुळे तरुण नासत आहे. त्यांना उभारी देणार कोण. आपल्याला त्यांना उभारी देणार आहोत. संविधानाची प्रत राहुल गांधींनी दाखवलं. मी वर्षाताईला म्हटलं मलाही दे. खूप छान आहे, संविधान. वाचवायचं आहे संविधान. अजून पूर्ण वाचलेलं नाही. महाराष्ट्रातील निवडणूक त्यासाठीच आहे. संविधान बचाव फेक नरेटिव्ह वाटत असेल तर अदानीच्या घशात मुंबई घालण्याचे जे जीआर निघाले ते फेक आहे काय. अदानीच्या घशात जागा दिल्या जात आहे. मुंबई अदानीमय केली जात आहे. आमचं सरकार आल्यावर चुकीच्या निविदा काढल्या, ज्या सवलती अदानीला देऊन मुंबई नासवली जाते ते कंत्राट रद्द करू. आम्ही धारावीकरांना सुविधा दिल्याशिवाय घर दिल्याशिवाय राहणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. अनेक जण भारतात राहत असले तरी देखील ते वेगनेगळ्या देशांचे...
उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होऊ देऊ नका, शिंदे भाजपाच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा: मल्लिकार्जून खर्गे
‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी