फडणवीस यांच्या आदेशाला मावळ भाजपची केराची टोपली; ‘मावळ पॅटर्न’ राबविण्यावर पदाधिकारी ठाम

फडणवीस यांच्या आदेशाला मावळ भाजपची केराची टोपली; ‘मावळ पॅटर्न’ राबविण्यावर पदाधिकारी ठाम

मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांचे काम करण्याचा भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ भाजपला दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत ‘मावळ पॅटर्न’ राबविण्याचा ठाम निश्चय पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे अजित पवार गट प्रचंड संतप्त झाला असून, याचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. मावळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली. पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. भेगडे यांना मावळ भाजपसह अन्य पक्षांनी जाहीर पाठिंबा देत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आणला. दुसरीकडे मावळातील भाजपच्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे देत बापू भेगडे यांचा प्रचारही सुरू केला आहे.

मावळमध्ये शेळके यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने दबावतंत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी चिंचवडमधून अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शेळके यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकारी सक्रिय होण्याचे आणि जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण माघार घेतल्याचे काटे यांनी जाहीर केले. मात्र, त्यानंतरही भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे बापू भेगडे यांचा प्रचार करण्यावर ठाम आहेत.

याबाबत माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, मावळची लढाई ही प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आम्ही भेगडे यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम आहोत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध, पण आम्ही महाराष्ट्र…; संजय राऊतांचा हल्लाबोल फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध, पण आम्ही महाराष्ट्र…; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरु आहे, असं...
Amit Thackrey : पुढच्या वेळी घरी येताना… अमित ठाकरे यांना चिमुकलीचे पत्र, अशी मागणी केली की..
‘बेटेंगे तो कटेंगे’वर संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले जनतेचा ‘मिजाज’…
कैद्याकडून येणाऱ्या गिफ्टबद्दल जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण, ‘महागडे गिफ्ट मिळत असल्यामुळे…’
कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस… आमिर खानच्या वक्तव्यानंतर चाहते चिंतेत
कीर्तनात व्यत्यय आणल्याने शीख बांधव संतापले.. चलो चलो बाहर निकलो; ठाण्याच्या गुरुद्वारातून नड्डांना बाहेर काढले
धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये रुग्णालात आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू