‘माफी मागा’, राऊतांच्या त्या वक्तव्यावर शायना एन. सी यांचा संताप; सावंतांना पुन्हा सुनावलं
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी यांच्यासंदर्भात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.
मुंबादेवीमध्ये बाहेरचा उमेदवार दिला यावरून टीका करताना त्यांनी इम्पोर्टेड माल चालणार नाही असं म्हटलं होतं. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना यामध्ये महिलांचा कोणताही अपमान झाला नसल्याचं म्हटलं आहे. आता यावरून पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी चांगल्याच आक्रमक झाल्या असून, त्यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाल्या शायना एन. सी. ?
काल अरविंद सावंत जे माझ्याबद्दल बोलले. स्वाभिमानी महिलेला ते माल म्हणतात. अमीन पटेल हसत होते. आज आरविंद सावंत माफी मागतात. तस संजय राऊत म्हणतात की महिलांचा कोणताही अपमान झालेला नाही. एक खासदार 2014 मध्ये तेव्हा मी त्यांच्यासाठी लाडकी बहीण होते. आता मी इम्पोर्टेड माल आहे. इम्पोर्टेड उमेदवार? असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता, माझा पूर्ण परिवार दक्षिण मुंबईत राहतो. पण काही जण वांद्रेमध्ये राहतात आणि वरळीतून निवडणूक लढवतात असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली. संजय राऊत यांनी सांगावं इथे तुम्ही मला हे सर्टिफिकेट दिलं की मी इम्पोर्टेड माल आहे. यांच्या प्रचारात मी लाडकी बहीण होते. तर आता मी इम्पोर्टेड माल झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या मनस्थितीवर प्रश्चचिन्ह उपस्थित होते. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी माफी मागावी. मुंबा देवीचा आशीर्वाद आहे. मी नेहमी काम करणार. मी एक महिला आहे कोणाची माल नाही. मी मुंबा देवीची मुलगी आहे, लढेल आणि जिंकेल, असं शायना एन. सी. यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List