बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांकडून काळा दिन; सायकल, दुचाकी रॅली, हजारो तरुण सहभागी
कानडी प्रशासन आणि पोलिसांची दडपशाही झुगारून लावत बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिक बांधवांनी काळा दिन पाळला. यावेळी बेळगावमध्ये भव्य सायकल व दुचाकी रॅली काढण्यात आली. यात हजारो मराठी तरुण सहभागी झाले होते. काळे ध्वज फडकवत, तोंडाला व हाताला काळी फित बांधून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदविला. ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ असा निर्धारही मराठी भाषिक सीमाबांधवांकडून करण्यात आला.
1956 साली बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह 865 मराठी भाषिक गावांना जबरदस्तीने कर्नाटकात डांबण्यात आले. दरवर्षी कर्नाटक स्थापनादिनी 1 नोव्हेंबरला सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांकडून काळा दिन पाळण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीने पंधरा दिवसांपूर्वी एक नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून पेंद्र सरकारला मराठी जनतेच्या भावना दर्शविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पण पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काळा दिन पाळल्यास कारवाई करू, असा इशारा दिला होता. पण गेल्या 68 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मराठी भाषिकांनी कानडी प्रशासनाच्या धमकीला न जुमानता रॅली यशस्वी करून दाखवली.
सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात सोडवून घेण्यास कामाला लागा – किणेकर
नोव्हेंबरअखेर महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल. त्यानंतर 1 डिसेंबर 2024 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयात सोडवून घेण्याच्या जिद्दीने आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे, असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List