जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा परप्रांतीय मजुरांवर हल्ला, दोन मजुरांना गोळ्या मारल्या
जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा परप्रांतीय मजुरांवर हल्ला झाला आहे. दशहतवाद्यांनी दोन मजुरांवर गोळीबार केला आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. तसेच जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Two non-locals shot at, injured in J-K’s Budgam
Read @ANI Story | https://t.co/gFDLymlkeQ#JammuAndKashmr #Budgam #firing pic.twitter.com/VCGqIs6ad2
— ANI Digital (@ani_digital) November 1, 2024
उस्मान मलिक आणि सुफिया हे दोन मजूर मुळचे उत्तर प्रदेशचे असून दोघे पाणी पुरवठा विभागात मजूरी करत होते. आज दशहतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी झाले असून त्यांना जेवीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वीही परप्रांतीय मजुरांवर असा हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजूरांना लक्ष्य केले होते. गेल्या काही दिवसातली ही चौथी घटना आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List