आठवलेंची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीसांकडून मिळालं मोठं आश्वासन!

आठवलेंची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीसांकडून मिळालं मोठं आश्वासन!

राज्यात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, जागा वाटप होऊन उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले आहेत. आता प्रचारात रंगत आली आहे, मात्र तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडीमधील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून अजूनही नाराजी दिसून येते आहे. याचा फटका हा निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे बड्या पक्षांकडून मित्र पक्षांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला राज्यात केवळ एकच जागा मिळाली आहे. यावर आता पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे.  लोकसभेला महाराष्ट्रात नरेटीवमुळे आमचं मोठं नुकसान झालं. तरी लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. महायुतीला विधानसभेत 170 पर्यंत जागा मिळतील. आरपीआयला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती, मात्र मी ती दूर केली आहे. विधानसभेला जरी एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीचे 17 उमेदवार लोकसभेला जिंकले त्यात आमच्या पक्षाची मतं देखील आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजप उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद सावंत हे तसे चांगलं कल्चर असलेले खासदार आहेत, शायना एनसी यांना माल म्हणणे ही गंभीर बाब आहे. त्यांचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी. सोबतच महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट
गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात...
‘फटाके एवढे वाजवा की त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचवा’, रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी
Geeta Kapur : ‘माझ्या आयुष्यात कधी कोण पुरुष…’, प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूर अजून अविवाहित का?
Sunny Deol : सनी देओलने त्या अभिनेत्रीला जवळ घेणं, मुलाला सहनच झालं नाही, तो थेट…
सुशांत मला सतत…, अभिनेत्यासोबत असलेले ‘प्रेमसंबंध’ मान्य करत साराचा खळबळजनक खुलासा
बद्धकोष्ठता दूर करायची मग ‘हे’ फळ भिजवून खा, लगेचच दिसतील परिणाम
काटेकोर डाएट, हेल्थी जेवण तरीही कमी वयात आजार; समंथापासून ते निक जोनसपर्यंत कित्येक बडे सेलिब्रिटी डायबिटीज पेशंट