भाजपने अजित पवारांना ब्लॅकमेल केलं, जयंत पाटील यांचा आरोप
भाजपने अजित पवारांवर 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यांना ब्लॅकमेल केलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठीच भाजपने या आरोपांचा वापर केला असेही पाटील म्हणाले.
इंडियन एक्सप्रेस या दैनिकाला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली. तेव्हा पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधात होते तेव्हा त्यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले. फडणवीस जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी आर आर पाटील यांच्यावर आरोप करून अजित पवार यांना फाईल दाखवली. याचा अर्थ या आरोपांचा वापर आमचा पक्ष फोडण्यासाठी केला गेला. त्यानंतर या फाईल्स दाखवून अजित पवारांना 10 वर्ष ब्लॅकमेल केलं. म्हणून अजित पवार भाजपसोबत गेले असं दिसतंय.
त्यामुळेच अजित पवारांनी स्वतःला महायुतीतून दूर केले असे जयंत पाटील म्हणाले. पण अजित पवारांनी आर आर पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. या विधानामुळे भाजप एक्सपोज झाली आहे. तसेच गेल्या 10 वर्षात फडणवीस आणि अजित पवार यांचे संबंध कसे आहेत हे ही समोर आले आहेत असेही पाटील म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List